जीबी सिंड्रोमचा राज्यात दुसरा बळी, ससूनमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू; रुग्णसंख्या १२७ वर
GBS Update in Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्या 111 वर पोहोचली असून, यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रुग्णांपैकी 80% रुग्ण नांदेड गाव आणि नांदेड सिटी परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील परिसरातील असल्याचे निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
महापालिका आयुक्तांनीही दूषित विहिरीमुळे साथ पसरल्याचे मान्य केले आहे. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.
आरोग्यमंत्र्यांचा आढावा दौरा
गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सोमवारी नांदेड परिसरातील दूषित विहिरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आरोग्यमंत्र्यांनी यानंतर शासकीय यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.दूषित पाणी आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने त्वरित पावले उचलावी. विहिरींची स्वच्छता आणि जलशुद्धीकरणाचे कठोर उपाय त्वरित राबवणे गरजेचे आहे.
गुलियन-बॅरे सिंड्रोमसाठी केंद्र सरकारचे उच्चस्तरीय पथक महाराष्ट्रात दाखल
पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय आणि बहु-विषयक तज्ज्ञ पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. या पथकाचे मुख्य उद्दिष्ट राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि संशयित तसेच पुष्टी झालेल्या प्रकरणांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी मदत करणे आहे. पुण्यात GBS प्रकरणांचे थैमान सुरू असून, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या या पथकात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असून, हे पथक राज्याच्या आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधत कार्यरत आहे.
आता ‘या’ कंपनीच्या बाईक दिसणार चौका-चौकात, मोठ्या शहरांमध्ये उघडले अजून 10
जीबीएस प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रुग्णांची प्रभावी उपचार सुविधा सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे काम करत आहेत. पुणे शहरातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे प्रकरणे वाढल्याचा संशय असल्याने, पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी आणि स्वच्छता यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र सरकारचे पथक रुग्णसंख्येचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाय सुचवणार असून, पुणे महापालिका आणि आरोग्य विभागाला योग्य ते उपाय राबवण्यासाठी मदत करेल. यामुळे पुण्यातील GBS प्रकरणांवर नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.