Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर उद्योग अडचणीत; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे ‘ही’ मोठी मागणी

साखरेचा सरासरी उत्पादन खर्च ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला असल्याने साखरेचा किमान विक्री दर तातडीने ४३ रुपये प्रतिकिलो करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2026 | 02:03 PM
साखर उद्योग अडचणीत; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे 'ही' मोठी मागणी

साखर उद्योग अडचणीत; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे 'ही' मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : मागील सात वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या हा दर ३१ रुपये प्रतिकिलो असून या कालावधीत उसाच्या रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखरेचा सरासरी उत्पादन खर्च ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला असल्याने साखरेचा किमान विक्री दर तातडीने ४३ रुपये प्रतिकिलो करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

 

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागील महिन्यात भेट घेतली होती. या बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध मुद्द्यांबाबत पाटील यांनी संबंधित विभागांच्या सचिवांची पुन्हा भेट घेऊन साखर उद्योगाच्या मागण्या मांडल्या.

साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलचे खरेदी दर गेल्या चार वर्षांपासून स्थिर आहेत. मात्र, या कालावधीत उसाच्या एफआरपीमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर ६७ रुपये प्रतिलिटर आणि उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ७२ रुपये प्रतिलिटर करण्यात यावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.

ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामापूर्वी साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलचे दर वाढविण्यात आले नाहीत, तर उद्योगासमोर गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही पाटील यांनी दिला. साखर उद्योगाचा इथेनॉल वाटपातील हिस्सा ९० टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. उद्योगाने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या उत्पादन क्षमतेचा पुरेसा वापर होत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे महासंघाने नमूद केले. हे नुकसान टाळण्यासाठी धान्य आणि साखर क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीत समान वाटपाची भूमिका स्वीकारावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, प्रतिदिन १०० टनांपेक्षा अधिक ऊस गाळप क्षमता असलेल्या गूळ व खांडसरी कारखान्यांना ऊस (नियंत्रण) आणि साखर (नियंत्रण) कायद्याच्या कक्षेत आणणे आवश्यक असल्याचे महासंघाने स्पष्ट केले. अन्यथा मोठ्या प्रमाणावर ऊस या उद्योगांकडे वळून साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

केंद्र सरकार व राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या कृती दलाने दर महिन्याला प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार धोरणात्मक निर्णय घ्यावेत. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी बी-हेवी मळीच्या वापराला अधिक प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही महासंघाने केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Harshvardhan patil has made a major demand to the central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Farmers
  • Harshvardhan Patil
  • Sugarcane

संबंधित बातम्या

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
1

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
2

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
4

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.