Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांसाठी गुड न्यूज! Pune Metro चा ‘हा’ महत्वाचा टप्पा मे महिन्यात सुरू होणार

Pune Metro: केवळ कागदी अहवालांवर विसंबून न राहता, महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी सकाळी २३.२ किमीच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 03:14 PM
पुणेकरांसाठी गुड न्यूज! Pune Metro चा ‘हा’ महत्वाचा टप्पा मे महिन्यात सुरू होणार
Follow Us
Follow Us:

‘मेट्रो लाईन ३’ च्या कामाला आता कमालीचा वेग
आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून केली पाहणी
१२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे लक्ष्य

पिंपरी: पुण्याची जीवनवाहिनी ठरू पाहणाऱ्या ‘मेट्रो लाईन ३’ च्या कामाला आता कमालीचा वेग आला आहे. हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मार्गावरील पहिल्या टप्प्याचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करून १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे लक्ष्य ‘पीएमआरडीए’ने (PMRDA) निश्चित केले आहे. खुद्द महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून ‘ऑन ग्राउंड’ आढावा घेतल्याने या प्रकल्पाच्या कामाला आता ‘मिशन मोड’वर गती मिळाली आहे.

प्रशासकीय अट्टहास विरुद्ध प्रवाशांची मागणी
या प्रकल्पाबाबत सध्या दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. खासगी कंत्राटदार कंपन्यांचा असा अट्टहास आहे की, सर्व स्थानकांचे काम पूर्ण झाल्याशिवाय मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू करावी. मात्र, दुसरीकडे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की, काम पूर्ण झालेली स्थानके (उदा. बाणेरपर्यंत) तातडीने सुरू करावीत. प्रवाशांच्या मते, “ढकल स्टार्ट” किंवा अर्धवट सुविधेपेक्षा टप्प्याटप्प्याने पण खात्रीशीर सेवा मिळणे आवश्यक आहे.

Pune Metro: प्रदूषणाशी लढा! मेट्रो प्रवासातून दर किलोमीटरला वाचतोय १०८.५ मिलीग्रॅम $CO_2$

आयुक्तांची ‘ऑन ग्राउंड’ धडक पाहणी
केवळ कागदी अहवालांवर विसंबून न राहता, महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी सकाळी २३.२ किमीच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली. माण डेपो ते शिवाजीनगर दरम्यानच्या २३ स्थानकांचा आढावा घेताना त्यांनी कंत्राटदार कंपन्यांना स्पष्ट बजावले की, “कामाचा वेग वाढवा, पण गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.”

प्रकल्पाची सद्यस्थिती काय?
प्रगती: प्रकल्पाचे ९४.२०% काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
चाचण्या: सध्या सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी सुरू असून आरडीएसओ (RDSO) आणि सीएमआरएस (CMRS) कडून तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
लक्ष्य: मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके कार्यान्वित करणे.

वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये दररोज लाखो कर्मचारी ये-जा करतात. सध्या या प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येईल, ज्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषणातही घट होईल.

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

“मे २०२६ पर्यंत १२ स्थानकांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामाचा आढावा घेऊन कंत्राटदारांना सूचना दिल्या आहेत. पीएमआरडीएकडून प्रकल्पासाठी सर्व प्रकारचे सहकार्य तत्परतेने दिले जाईल.”
— डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

एका नजरेत: पुणे मेट्रो लाईन ३

वैशिष्ट्य ‌                                 तपशील
प्रकार               देशातील पहिली पीपीपी (PPP) तत्त्वावरील मेट्रो
भागीदार       टाटा समूहाची ‘TRIL’ आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स
एकूण मार्ग           २३.२ किमी (उन्नत मार्ग – Elevated)
एकूण खर्च                   ८,३१३ कोटी रुपये

Web Title: Hinjewadi shivajinagr metro route may 2026 end pmrda pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Pimpri
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त
1

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
2

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.