Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण…

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (ता. ७) रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वनविभागाने घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 08:38 PM
महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण...

महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण...

Follow Us
Follow Us:

खडकवासला धरणात ८.३२ टीएमसी पाणीसाठा
पुण्याला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट
आज दिवसभरात पुण्यात मुसळधार पाऊस

पुणे/सुनयना सोनवणे: नैऋत्य मान्सूनची उत्तरी सीमा सध्या स्थिर असून पुढील तीन दिवसांत ती उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, हरियाणा, पंजाबचा उर्वरित भाग तसेच राजस्थानच्या काही भागांपर्यंत विस्तारण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, दक्षिण झारखंड व लगतच्या उत्तर अंतर्गत ओडिशावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते पुढील चोवीस तासांत झारखंड, उत्तर छत्तीसगड व पूर्व मध्य प्रदेशातून वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सोमवारीही कायम राहिला. भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार असल्याने शहर व जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. ६)शहरात कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. मंगळवारी (ता. ७) कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून किमान तापमान स्थिर राहू शकते, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील दोन दिवस शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने घाट विभागात रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला असून शहरी भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित

शहरातील पाऊस ( मिमी मध्ये)

चिंचवड – १३२ मिमी
गिरिवन – ११९.९ मिमी
निंबगिरी – ७२.० मिमी
भोर – ६९.५ मिमी
पाषाण – ६९ मिमी
दुधुळगाव – ६३.० मिमी
दापोडी – ६२.५ मिमी
शिरूर – ५८.०मिमी
शिवाजीनगर – ५३.२ मिमी
राजगुरुनगर – ५०.५ मिमी
मालीन – ४२.० मिमी
एनडीए– ३१.५ मिमी
नारायणगाव – १८.० मिमी
हडपसर – ९.५ मिमी
हवेली – ७.० मिमी
बारामती – ५.० मिमी

हवामान विभागाचा इशारा
पुणेकरांची या पावसानंतरही सुटका होण्याची चिन्हे नाहीत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी आणि गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेड अलर्टमुळे सिंहगड घाट पर्यटकांसाठी बंद

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (ता. ७) रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय पुणे वनविभागाने घेतला आहे. नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या दोन दिवसांत सिंहगड परिसरात प्रवेशास बंदी घालण्यात आली असून, पुढील परिस्थितीचा आढावा घेऊनच परिसर पुन्हा खुला करण्यात येणार आहे.

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन

खडकवासला साखळीतील पाणीसाठा ८.३२ टीएमसीवर
खडकवासला
धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सलग पाचव्या दिवशीही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरणांमध्ये मिळून ८.३२ टीएमसी (२८.५५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याने धरणसाखळीतील साठा गेल्या दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोर धरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतचा तातडीचा ताण कमी झाला आहे.

Web Title: Imd gave orange alert to pune khadakwasla dam water discharge schools holiday imd rain alert heavy rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Khadakwasla Dam
  • Pune Rain News
  • Sinhgad Fort

संबंधित बातम्या

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
1

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
2

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
3

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.