Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार

पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2026 | 07:53 PM
Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार
Follow Us
Follow Us:

ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता 
राज्यासह पुण्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला
राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. मात्र, शनिवारी (ता. २८) कमाल तापमान स्थिर राहिले असून, हवामानात अचानक बदल पाहायला मिळाला. तर पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांसह पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे आणि परिसरामध्ये शनिवारी सकाळी आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात हळूहळू बदल झाला. दुपारी ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने पुणेकरांना वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळच्या सुमारास शहरात आकाश पूर्णतः ढगाळ झाले होते. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये कमाल तापमान स्थिर राहून ३८ अंश सेल्सिअस इतके तर किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार आहे. त्यानंतर मात्र कमाल तापमानात हळूहळू किंचित घट होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Maharashtra Rain Alert: इकडे लक्ष द्या! छत्री घेऊनच निघा नाही तर…; ‘या’ भागात पावसाचा रुद्रावतार

पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून (ता. ३१) कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट 
सध्या वातावरणाच्या विविध स्तरांवर पश्चिमेकडील वाऱ्यांची द्रोणीय स्थिती आहे. याशिवाय उत्तर इराण परिसरातील पश्चिमी विक्षोभ आणि आसाम, पश्चिम बंगालसह दक्षिण भारतातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्यापही कायम आहे. त्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यात ढगाळ वातावरण व पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…

परिणामी सोमवारी (ता. ३०) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये, तर मंगळवारी (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने, हवामानशास्त्र विभागाने या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट दिला आहे.

Web Title: Imd heavy rain alert in marathwada konkan pune weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Rain
  • Pune Weather

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत
2

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज
3

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…
4

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.