Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

डासजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण आणि औषधफवारणी सुरू केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 23, 2026 | 02:35 AM
पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
Follow Us
Follow Us:
  • डासांचा डंख वाढल्याने पुणेकर सावध
  • पुणे शहरात १,७०८ डासोत्पत्तीस्थळांचा शोध
  • ३९ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या
सुनयना सोनवणे /पुणे: पावसामुळे शहराच्या विविध भागांत साचलेले पाणी डासांच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने पुण्यात डासजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत डेंग्यूचे ९२० संशयित रुग्ण आढळले असून, ३९ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचबरोबर चिकुनगुनियाचे १४ रुग्णही आढळले आहेत. महापालिकेच्या सर्वेक्षणात डासांची उत्पत्ती होणारी तब्बल १,७०८ ठिकाणे आढळून आली आहेत. आज(२०ऑगस्ट ) जागतिक डास दिन साजरा होत असताना शहरातील ही स्थिती डास नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहभागाची गरज अधोरेखित करणारी आहे. विशेषतः जून आणि जुलैमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येत झालेली वाढ चिंताजनक आहे.

डासजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण आणि औषधफवारणी सुरू केली आहे. संवेदनशील भागांची स्वतंत्र नोंद करून तेथे उपाययोजना करण्याबरोबरच तापाच्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. आशा कार्यकर्त्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येत आहे.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी केवळ औषधफवारणीवर अवलंबून न राहता पाणी साचणारी ठिकाणे नष्ट करणे, पाण्याचा निचरा करणे आणि गप्पी माशांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. शाळा, महाविद्यालये, सोसायट्या आणि विविध संस्थांमध्ये महापालिकेकडून जनजागृतीही केली जात आहे.

बदलत्या हवामानासोबत डासांचेही ‘गणित’ बदलले! का साजरा करतात जागतिक डास दिन? जाणून घ्या सविस्तर

पुण्यातील डेंग्यूचा ‘ग्राफ’ 

कालावधी डेंग्यूचे संशयित रुग्ण

जून – १७५
जुलै – ३२३
ऑगस्ट (१८ तारखेपर्यंत) – २४९
एकूण – ९२०

डेंग्यू पॉझिटिव्ह : ३९
चिकुनगुनिया : १४
डासोत्पत्तीस्थळे : १,७०८
डेंग्यू/मलेरियामुळे मृत्यू : शून्य

डासांना वाढण्यासाठी काय हवे?
थोडेसे साचलेले पाणी पुरेसे!
– कुंड्या आणि त्याखालील ताटल्या
– जुने टायर व टाकाऊ वस्तू
– उघड्या पाण्याच्या टाक्या
– घराच्या परिसरातील पाण्याचे डबके
– बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी
– नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये साचलेले पाणी

महापालिकेची ‘आठ कलमी’ तयारी 

सर्वेक्षण → डासोत्पत्तीस्थळांचा शोध → औषधफवारणी → ताप रुग्णांचा शोध → संवेदनशील भागांवर लक्ष → आशा कार्यकर्त्यांचा सहभाग → गप्पी माशांचा वापर → जनजागृती

Health Update: शहरासह ग्रामीणमध्येही साथ रोगाचे थैमान! टायफाईड, मलेरीया, डेंग्यूचे रूग्ण वाढले; १ हजार आयवी सेटची मागणी

२० ऑगस्ट – जागतिक डास दिवस
१८९७ मध्ये मलेरियाच्या प्रसाराचा धागा उलगडला. सर रोनाल्ड रॉस यांनी संक्रमित मादी ॲनोफिलीस डासाच्या माध्यमातून मलेरियाचा प्रसार होत असल्याचे सिद्ध केले. या शोधाच्या स्मरणार्थ २० ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा केला जातो. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांपासून बचावासाठी डासांची उत्पत्ती होऊ न देणे हाच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असल्याचा संदेश या दिवसातून दिला जातो.

Web Title: In pune 920 suspected dengue cases detected and 39 individuals tested positive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Dengue Virus
  • Health News
  • Pune

संबंधित बातम्या

Prakash Abitkar: मानसिक आरोग्यासाठी सरकारचा पुढाकार! टेली-मानस हेल्पलाइनसह उपचार सेवांचे बळकटीकरण
1

Prakash Abitkar: मानसिक आरोग्यासाठी सरकारचा पुढाकार! टेली-मानस हेल्पलाइनसह उपचार सेवांचे बळकटीकरण

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
2

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
3

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

अकोल्यात वाढतोय डेंग्यू, चिकनगुनियाचा धोका; डेंग्यूचे 155 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण
4

अकोल्यात वाढतोय डेंग्यू, चिकनगुनियाचा धोका; डेंग्यूचे 155 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.