
बदलत्या हवामानासोबत डासांचेही 'गणित' बदलले! का साजरा करतात जागतिक डास दिन? जाणून घ्या सविस्तर
बदलते हवामान, पावसाचे बदलते स्वरूप आणि शहरात ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे डासांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर दिसून येत असून, यंदाच्या पावसाळ्यात जून ते १५ ऑगस्टदरम्यान मुंबईत ३१७७ मलेरिया आणि १०७९ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. उद्या साजऱ्या होणाऱ्या जागतिक डास दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डासांचा वाढता धोका पुन्हा ऐरणीवर आला आहे. मलेरियाच्या रुग्णसंख्येत यंदा वाढ दिसून येत आहे. जूनमध्ये ६५५, तर जुलैमध्ये १३८० मलेरियाचे रुग्ण नोंदले गेले. १५ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली. दुसरीकडे, डेंग्यूचे १०७९ रुग्ण नोंदले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत मलेरिया वाढला असला, तरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.(फोटो सौजन्य – istock)
जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
डास नियंत्रणासाठी केवळ फॉगिंगवर अवलंबून न राहता घर, सोसायटी, बांधकामस्थळ आणि परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.२० ऑगस्ट हा जागतिक डास दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये मादी अनोफेलिस डासाच्या माध्यमातून मलेरियाचा परजीवी मानवांमध्ये संक्रमित होतो, हा महत्त्वाचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ पाळला जातो.
तापमान, आर्द्रता आणि पावसाचे स्वरूप यांचा डासांच्या जीवनचक्रावर परिणाम होतो. अनियमित किंवा जोरदार पावसानंतर साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरू शकते. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात बांधकामस्थळे, टाक्या, टायर, भंगार साहित्य, कुंड्या आणि इतर छोट्या पाणीसाठ्यांमध्ये डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असते.पालिकेच्या तपासणीत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ शकणारी ४,७४,३४१ ठिकाणे तपासण्यात आली. त्यापैकी ११,२२७ ठिकाणी एडीस डासांची उत्पत्ती आढळली. तसेच मलेरियाच्या संभाव्य उत्पत्तीच्या ठिकाणांपैकी ३,३१९ ठिकाणी अॅनॉफिलीस डासांची उत्पत्ती आढळली.
प्रामुख्याने मुंबईतील तापमान, आर्द्रता आणि लहरी पाऊस हे तिन्ही मुद्दे एडिस आणि अना के ली स डासांसाठी पोषक आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक कितीही डासाच्या कामे केली, तरी ती वातावरण बदलामुळे अपुरी पडत आहेत, अशी माहिती राजन नारिंग्रेकर, निवृत्त कीटक नियंत्रण विभाग प्रमुख, मुंबई महानगरपालिका.यांनी दिली आहे.
Ans: जागतिक डास दिन दरवर्षी २० ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.
Ans: डासांमुळे होणारे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार आणि त्यांच्या प्रतिबंधाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
Ans: होय. तापमान, पाऊस आणि आर्द्रतेतील बदल डासांच्या प्रजननासाठी पोषक परिस्थिती निर्माण करू शकतात. त्यामुळे काही भागांमध्ये डासांची संख्या आणि त्यांच्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका बदलू शकतो.