Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना अपघाताची भीती, ना वेगाचं टेन्शन! ‘या’ रेल्वेमार्गावर स्वदेशी ‘कवच’ प्रणाली; सुरक्षा अधिक भक्कम

पुणे-मिरज मार्गावर कवच सुरू झाल्यामुळे पुणे विभागातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित झाले आहे.यावेळी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, तांत्रिक पथकासह अधिकारी उपस्थित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 06:13 PM
ना अपघाताची भीती, ना वेगाचं टेन्शन! ‘या’ रेल्वेमार्गावर स्वदेशी ‘कवच’ प्रणाली; सुरक्षा अधिक भक्कम
Follow Us
Follow Us:
  • पुणे-मिरज रेल्वे मार्गावर स्वदेशी ‘कवच’ प्रणाली
  • पुणे विभागातील ही पहिलीच यशस्वी कवच प्रणाली
  • प्रवाशांची सुरक्षा अधिक भक्कम होणार 
पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाला गती देत, प्रवाशांची सुरक्षा भक्कम करण्याच्या उद्देशाने पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर पहिली स्वदेशी बनावटीची ‘स्टँडर्ड (मानक) कवच’ स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे. (दि. १४) रोजी गाडी क्र. ०१०२३ पुणे-एससीएसएमटी कोल्हापूर विशेष रेल्वे गाडीला ‘कवच’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.पुणे विभागातील ही पहिलीच यशस्वी कवच प्रणाली ठरली आहे.यामुळे प्रवाशांची सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे.

‘कवच’ ही पूर्णपणे भारतात विकसित केलेली (स्वदेशी) एक अत्यंत प्रगत स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. ही यंत्रणा रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. शिवाय रेल्वे गाडीच्या हालचालींवर आणि वेगावर बारीक लक्ष ठेवते.तसेच निर्धारित वेगमर्यादा आणि सुरक्षित रेल्वे संचालनाच्या नियमांचे अचूक पालन करण्यासाठी ही यंत्रणा लोको पायलटला सतत मदत करते.याशिवाय रेल्वेचा वेगमर्यादेपेक्षा जास्त झाल्यास किंवा समोरून काही धोका निर्माण झाल्यास, अपघातांची शक्यता टाळण्यासाठी ही प्रणाली तातडीने स्वयंचलितपणे (आॅटोमॅटिक) ब्रेक लावून रेल्वे थांबवण्यास मदत करते.

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

पुणे-मिरज मार्गावर कवच सुरू झाल्यामुळे पुणे विभागातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित झाले आहे.यावेळी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, तांत्रिक पथकासह अधिकारी उपस्थित होते.

आगामी काळात विभागातील इतर काही निवडक महत्त्वाच्या मार्गांवरही ‘कवच’ प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल.यामुळे भविष्यात प्रवासी गाड्यांसोबतच मालगाड्यांचीही परिचालन सुरक्षा, विश्वासार्हता आणि रेल्वे वाहतूक अधिक वेगवान व सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.

– राजेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान

चालत्या ट्रेनमध्ये घाईघाईने चढण्याचा प्रयत्न करताना एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील धोकादायक पोकळीत (गॅप) कोसळली. मात्र पुणे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले. ही घटना पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दिनांक  सकाळी १०:३८ वाजता घडली. 

Web Title: Indigenous kavach system installed on the pune miraj railway route making travel safer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Pune Railway Station News
  • Railway News

संबंधित बातम्या

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा
1

आता खासगी कंपन्या ट्रेन चालवणार; 40 टक्केच असणार भारतीय रेल्वेचा हिस्सा

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम…
2

देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम…

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
3

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.