Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, म्हणाले; पुढील तीन ते चार महिन्यात…

महाराष्ट्र शासन पुढील तीन ते चार महिन्यांत देशातील पहिले 'एआय धोरण' जाहीर करणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 11:33 AM
उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, म्हणाले; पुढील तीन ते चार महिन्यात...

उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, म्हणाले; पुढील तीन ते चार महिन्यात...

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रात देशातील पहिले ‘एआय’ धोरण लवकरच
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
  • स्थानिक प्रश्नांवरही सामंत यांच्याकडून सविस्तर भाष्य
पिंपरी : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे औद्योगिक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून, महाराष्ट्र शासन पुढील तीन ते चार महिन्यांत देशातील पहिले ‘एआय धोरण’ जाहीर करणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी उद्योग, पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. दरम्यान, सामंत यांच्या हस्ते बिजलीनगर येथील एमआयडीसीच्या श्री साईदत्त सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उद्घाटन झाले. १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २४ महिन्यांत २६५ घरांचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

सामंत म्हणाले, “एआय विकसित करताना मानवी मेंदूची आणि उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामासाठी माणसांची गरज कायम राहणार आहे. या तंत्रज्ञानाचा रोजगारावर काय परिणाम होईल आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत, याचा शासन अभ्यास करत आहे. तसेच, एआयवर आधारित विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमही तयार केले जातील.”

नदी सुधार आणि सांडपाणी प्रक्रिया

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि पर्यावरण विभागाने एकत्रितपणे २,५०० कोटी रुपयांचा नदी सुधार आराखडा तयार केला असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

प्रदूषण नियंत्रण : इंद्रायणी आणि पवना नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असंही सामंत यांनी सांगितलं.

सीईटीपी प्रकल्प

भोसरी एमआयडीसीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी (CETP) नागरिकांच्या तक्रारींनंतर आता नवीन जागेचा शोध सुरू असून, महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.

पायाभूत सुविधा आणि अतिक्रमण निर्मूलन

हिंजवडी उड्डाणपूल

या पुलासाठी ६५० कोटी रुपये मंजूर झाले असून, टीआरडीच्या माध्यमातून जागेचा प्रश्न सुटला आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे, असं सामंत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

अतिक्रमणांवर हातोडा

आचारसंहिता संपल्याने एमआयडीसी क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सहा महिन्यांत सर्व अनधिकृत बांधकामे हटवून वाहतूक कोंडी फोडण्यावर भर दिला जाईल. चाकण परिसरातील रस्ते आणि पुलांची कामे पूर्ण झाल्यावर तेथील वाहतूक समस्याही सुटेल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Web Title: Industries minister uday samant has made a big announcement from pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad
  • Uday Samant

संबंधित बातम्या

MLC Election 2026: “कठीण पेपर संपलाय, आता फक्त…”, अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले…
1

MLC Election 2026: “कठीण पेपर संपलाय, आता फक्त…”, अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले…

अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा, CID तपासावरही उपस्थित केले प्रश्न!
2

अजित पवारांच्या विमान अपघाताला ४ महिने पूर्ण; रोहित पवारांचा फडणवीस सरकारवर निशाणा, CID तपासावरही उपस्थित केले प्रश्न!

PCMC News: जनगणनेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; पीसीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचा थेट  इशारा
3

PCMC News: जनगणनेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; पीसीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचा थेट इशारा

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द
4

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.