Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी

Uday Samant at District Planning Committee Meeting Solapur: सोलापुरातील आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक वेळेत उपस्थित न राहिल्याने उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाल्यानंतर त्यांनी प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंद खोलीत कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 11, 2026 | 08:40 PM
सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी
Follow Us
Follow Us:
  • सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा
  • उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी
  • प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यावर नाराज
सोलापूर, शहर: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक वेळेत उपस्थित न राहिल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. प्रोटोकॉलचे पालन न झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बंद खोलीत कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर उद्योग विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती.

साक्षात सूर्यनारायणाला ‘प्रभामंडळा’चा रिंगण; Dive घाटात विठ्ठलाच्या मूर्तीवर ‘प्रभामंडळ’, पहा अद्भुत क्षण

अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही बैठक नियोजन समितीच्या बैठकीनंतर घेण्यात यावी, असे निश्चित झाल्याने सामंत यांनी आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून बैठकीची वेळ पुढे ढकलली होती. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतरही जवळपास अर्धा तास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बैठकीसाठी उपस्थित न झाल्याने उद्योगमंत्री संतप्त झाल्याची चर्चा आहे. वरिष्ठ मंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागणे हा प्रोटोकॉलचा भंग असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले.

तर मीच शिवसैनिकांसह तुमच्या कार्यालयात येईन

‘आणखी दहा मिनिटांत बैठकीला उपस्थित राहा, अन्यथा मीच शिवसैनिकांसह तुमच्या कार्यालयात येतो,’ अशा शब्दांत उद्योगमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबत सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रोटोकॉलचे पालन, बैठकीला झालेला विलंब आणि मंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही अधिकाऱ्यांना सामंत यांनी जाब विचारल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

Ambegaon Landslide: आंबेगावातील दरडग्रस्त ५ गावांचे पुनर्वसन करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी ग्वाही

Web Title: Solapur news uday samant administrative meeting collector sp maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Solapur
  • Uday Samant

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश
1

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Solapur News: स्मार्ट सोलापूर सिटीवर Dirty चा लागला डाग! अंदाज समितीचा अंदाज; १२७० मीटर रस्त्यावर १५ कोटींचा खर्च
3

Solapur News: स्मार्ट सोलापूर सिटीवर Dirty चा लागला डाग! अंदाज समितीचा अंदाज; १२७० मीटर रस्त्यावर १५ कोटींचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.