Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर IT पार्कच्या जागेच्या निवडीवरून उद्योजकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेरअभ्यासाची घोषणा केली. तज्ज्ञांच्या शिफारशीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 09:39 PM
सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद

Follow Us
Follow Us:

सोलापूर, शहर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सोलापूर IT पार्कच्या जागेच्या निवडीबाबत आता फेरविचार करण्यात येणार आहे. उद्योजकांच्या मागणीनंतर आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रस्तावित जागांचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेली जागा आणि उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायी जागेचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यात येणार आहे. अत्याधुनिक, भविष्यात विस्ताराला पोषक आणि आयटी कंपन्यांसाठी अनुकूल ठरेल, त्याच ठिकाणी आयटी पार्क उभारण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. सोलापूर शहरातील होटगी परिसरात आयटी पार्क उभारण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र जागेच्या निवडीवरून उद्योजकांमध्ये विविध मतप्रवाह निर्माण झाले होते. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेऐवजी अन्य पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी उद्योजकांच्या बैठकीत करण्यात आली होती.

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी

या मागणीची दखल घेत उद्योगमंत्र्यांनी जागेच्या फेरविचाराला मान्यता दिली.सोलापुरात मोठ्या आयटी कंपन्यांना आकर्षित करणारे, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणारे आणि गुंतवणुकीला चालना देणारे आयटी पार्क उभारणे हा शासनाचा उद्देश असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरातील आधुनिक आयटी पार्क उभारण्याचा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री गोरे यांच्याशी मतभेद नाहीत

आयटी पार्कच्या जागेवरून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. “हा कोणताही वाद नाही. उद्योजकांनी केलेल्या जागेच्या पुनर्विचाराच्या मागणीचा हा विषय आहे. शासनाचा उद्देश सर्वोत्तम ठिकाणी आयटी पार्क उभारण्याचा आहे, असे त्यांनी सांगितले.

Ambegaon Landslide: आंबेगावातील दरडग्रस्त ५ गावांचे पुनर्वसन करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी ग्वाही

तज्ज्ञांच्या परिषदेत होणार जागेचा निर्णय

सोलापुरात आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत दोन्ही प्रस्तावित जागांचा तांत्रिक बाबी, वाहतूक सुविधा, पायाभूत सुविधा, भविष्यातील विस्तार क्षमता आणि उद्योगासाठी पोषक वातावरण या निकषांवर अभ्यास केला जाईल.तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टअंतर्गत सोलापुरात आयटी पार्क साकारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Web Title: Solapur it park site review uday samant devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Gas Cylinder Blast: गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक
1

Gas Cylinder Blast: गॅस स्फोटाने लातूरच्या १० कुटुंबांचा संसार उघड्यावर!; मंगळवेढ्यात भीषण अपघात, ४ दुचाकी जळून खाक

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!
2

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!

Ratnagiri News : केंद्रीय विद्यालय आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक; उदय सामंतांची विरोधकांवर टीका
3

Ratnagiri News : केंद्रीय विद्यालय आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक; उदय सामंतांची विरोधकांवर टीका

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
4

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.