Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; तब्बल 272 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रशासनाने तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 04:45 PM
Pimpri Chinchwad, Disaster Management

Pimpri Chinchwad, Disaster Management

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रशासनाने तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या आणि कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ही व्यापक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेतील या मोठ्या बदली प्रक्रियेमुळे कर्मचारी वर्गात दिवसभर चर्चांचे वारे वाहत होते. या बदल्यांचा महापालिकेच्या आगामी कामकाजावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

बदली प्रक्रियेतील तपशील

प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, यात विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये ७५ कनिष्ठ अभियंते, ३६ उपअभियंते, ५८ मुख्य लिपिक आणि १०३ लिपिकांचा समावेश आहे. महापालिकेचे अभियांत्रिकी, प्रशासकीय आणि लेखा विभागासह विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कारवाई

महापालिकेतील अनेक कर्मचारी मागील दीर्घकाळापासून एकाच विभागात कार्यरत होते. प्रशासकीय नियमांचे पालन करत आणि कामकाजात शिस्त आणण्यासाठी प्रशासनाने ही प्रक्रिया राबविल्याचे स्पष्ट केले आहे. या बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत नवीनता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांसाठी दिलासा! पीएमआरडीए अन् महारेलचा ऐतिहासिक करार; रेल्वेफाटक मुक्तीचा मार्ग मोकळा

पदभार स्वीकारण्याचे निर्देश

बदली झालेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या फेरबदलांमुळे विविध विभागांमधील समन्वयात सुधारणा होऊन, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक कार्यक्षमतेने आणि वेळेत उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची आत्महत्या; पत्नीचा गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गोंधळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील पुनावळे येथील माध्यमिक शाळेच्या आरक्षणाची ९१ गुंठे (९,१०० चौ.मी.) जागा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवकांच्या तीव्र विरोधानंतरही सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महापालिकेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, सत्ताधारी भाजपच्याच स्थानिक नगरसेवकांनी प्रशासकीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुनावळेतील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या ०.९१ गुंठे जागेसाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबविली होती. यामध्ये ‘ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशन’ या संस्थेने सात कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली होती. मात्र, ही जागा खासगी संस्थेला देण्याऐवजी तिथे महापालिकेची स्वतःची ‘सीबीएसई’ पॅटर्न शाळा उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती.

Web Title: Internal transfers of many employees of the pimpri chinchwad municipal corporation have been carried out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न मिटणार! भामा आसखेड प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
1

पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न मिटणार! भामा आसखेड प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

Moshi Garbage Disaster: मोशी दुर्घटनेची केंद्र सरकारकडून चौकशी करा! श्रीरंग बारणेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
2

Moshi Garbage Disaster: मोशी दुर्घटनेची केंद्र सरकारकडून चौकशी करा! श्रीरंग बारणेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.