Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटसमधील उमाजी नाईक फलकावर दगडफेकीचे प्रकरण तापलं; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

पाटस येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या फलकावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2026 | 05:24 PM
पाटसमधील उमाजी नाईक फलकावर दगडफेकीचे प्रकरण तापलं; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

पाटसमधील उमाजी नाईक फलकावर दगडफेकीचे प्रकरण तापलं; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Follow Us
Follow Us:

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या फलकावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक झाल्याचे चित्र शनिवारी (दि. ४) पाहायला मिळाले. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत अर्धा तास रस्ता रोखून धरला. संबंधित समाजकंटक आरोपींना पुढील दोन दिवसांत पोलिसांनी अटक करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी दिला आहे.

 

दौंड तालुक्यातील पाटस येथील गाव प्रवेशद्वार लगत जुन्या बाजार तळात असलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या फलकावर २८ मार्च रोजी अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर जय मल्हार क्रांती संघटना आणि समाज बांधवांनी पाटसगाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला होता. संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र सहा सात दिवस उलटूनही संबंधित आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने जय मल्हार क्रांती संघटनेने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला होता. त्यानुसार शनिवारी (दि.४ ) जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली संघटनेने पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोला नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले.

अर्धा तास महामार्ग रोखला

जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्गावर येत महामार्गावर बसून अर्धा तास महामार्ग रोखून धरला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी बोलताना जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी देशासाठी शहीद भुमीपुत्र राजे उमाजी नाईक यांची विटंबनेची घटना अतिशय निंदणीय असल्याचे सांगत कोणत्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, पोलीस प्रशासनाने पुढील दोन दिवसांत संबंधित आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी, तसे न झाल्यास पाटस पोलीस चौकीच्या समोर ठिया आंदोलन केले जाईल, असा इशारा शितोळे यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी लक्ष्मण जाधव, शंकर पवार, अविनाश मोहिते, रंजना भंडलकर आदींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

आंदोलनात जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, युवा अध्यक्ष सुधीर नाईक, संघटनेचे नेते बापुराव खोमणे, दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते उत्तम गायकवाड, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधार दलाचे नेते दत्ताभाऊ डाडर, नाभिक संघटनेचे नेते सुदाम गवळी, सुतार समाज संघाचे सामाजिक कार्यकर्ते गोरख सुतार आदींसह जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा : पाटस ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Web Title: Jai malhar kranti organization has become aggressive due to stone pelting on raje umaji naiks plaque

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Daund News
  • Daund Police
  • Patas

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
2

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
4

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.