Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्य लेखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश; नेमकं प्रकरण काय?

महापालिकेच्या तरतुदींमध्ये बोगस उपसूचनांच्या आधारे फेरफार करून ठेकेदारांना तब्बल ६० कोटी रुपयांची देयके अदा केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 12:10 PM
PCMC, Pimpri Chinchwad, Abhishek Barne, Pravin Jain,

PCMC, Pimpri Chinchwad, Abhishek Barne, Pravin Jain,

Follow Us
Follow Us:

पिंपरी : महापालिकेच्या तरतुदींमध्ये बोगस उपसूचनांच्या आधारे फेरफार करून ठेकेदारांना तब्बल ६० कोटी रुपयांची देयके अदा केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाच सदस्यीय समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयुक्तांनी कारवाई न केल्यास सर्व प्रमुख पदाधिकारी स्वतःहून गुन्हा दाखल करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर बोलत होते. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक कुणाल वाव्हळकर आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची कोणतीही अधिकृत मान्यता घेतली नाही. तर, केवळ बोगस उपसूचनांच्या आधारे ही देयके दिल्याचे समोर आले आहे. महापौर म्हणाले, “६० कोटी रुपयांचा हा गैरप्रकार अत्यंत गंभीर असून तो माफ करण्यासारखा नाही. जैन यांनी उपसूचनांची वैधता तपासणे आवश्यक होते. जर त्यांना हा चुकीचा कारभार करण्यासाठी कोणाचे दडपण आले, तर त्यांनी त्या नेत्यांची किंवा अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत.”

१० दिवसांत अंतिम अहवाल

अभिषेक बारणे यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत जैन दोषी असल्याचे आयुक्तांनीही मान्य केले आहे. येत्या १० दिवसांत या प्रकरणाचा सविस्तर अंतिम अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातील. तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या विषयावर शांत बसणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.

नगरसचिवांची गच्छंती अटळ?

दरम्यान, या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. एप्रिल महिन्याच्या सभेमध्ये २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाला चुकीच्या पद्धतीने मान्यता दिल्याप्रकरणी महापौरांनी आपली चूक मान्य करत माफी मागितली. मात्र, या तांत्रिक चुकीला नगरसचिव मुकेश कोळप जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांची गच्छंती करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. कोळप यांच्या जागी निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार? काँग्रेसचा सवाल

अर्थसंकल्पाचे गणित

एकूण अर्थसंकल्प : ५,९१४ कोटी रुपये.

एकूण प्राप्त उपसूचना : १५७.

मान्य उपसूचना : २५५ कोटींच्या १५ उपसूचना ग्राह्य.

अग्राह्य उपसूचना : ६५ पेक्षा जास्त उपसूचना फेटाळल्या.

बांधकाम परवानगी आणि कर संकलनातून मिळालेल्या वाढीव उत्पन्नाद्वारे या उपसूचनांचा खर्च भागवला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Mayor ravi landge has ordered the registration of a criminal case against the guilty officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप
1

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार
2

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.