Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा तहकूब; स्वीकृत सदस्यांची निवड आता २० नोव्हेंबरला?

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेची गुरुवारची (दि. १५) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली आहे. ही सभा आता येत्या ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2026 | 02:56 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा तहकूब; स्वीकृत सदस्यांची निवड आता २० नोव्हेंबरला?

पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा तहकूब; स्वीकृत सदस्यांची निवड आता २० नोव्हेंबरला?

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा तहकूब
  • पुढील महासभा ३० ऑक्टोबरला दुपारी २ वाजता
  • स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा निर्णय लांबणीवर
पिंपरी : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेची गुरुवारची (दि. १५) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली आहे. ही सभा आता येत्या ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. तर ऑगस्ट महिन्याची प्रलंबित तहकूब महासभा २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता घेतली जाणार आहे. परिणामी, गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा तिढा आता २० नोव्हेंबरच्या सभेत सुटण्याची शक्यता आहे.

 

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे कामकाज सुरू झाले. सभेच्या प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर तसेच कोकणातील व आळंदी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी सभागृह नेते प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे आणि नगरसेवक निलेश तरस यांनी दिवंगत कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.

श्रद्धांजलीचा ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्यास भाऊसाहेब भोईर यांनी अनुमोदन दिले. सध्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू असल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत भरधाव कार अन् दुचाकींना धडक; कोथरुडच्या एमआयटी रस्त्यावर नेमकं काय घडलं?

स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड अनेक महिन्यांपासून रखडली आहे. आता या निवडीवर थेट दिवाळीनंतर, म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजपकडून स्वीकृत सदस्यपदासाठी अनेक जण इच्छुक असून, वरिष्ठ पातळीवरून काही नावांना हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्वी ठरलेली तीन नावे कायम राहणार की ऐनवेळी त्यात बदल होणार, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.

हे सुद्धा वाचा : आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा का तहकूब झाली?

    Ans: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महासभा तहकूब करण्यात आली.

  • Que: महापालिकेची पुढील महासभा कधी होणार?

    Ans: पुढील महासभा ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.

  • Que: स्वीकृत सदस्यांची निवड कधी होण्याची शक्यता आहे?

    Ans: स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा तिढा २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत सुटण्याची शक्यता आहे.

Web Title: The general body meeting of the pimpri chinchwad municipal corporation has been adjourned nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! १० टक्के पाणीकपातीला सुरुवात; अपव्यय केल्यास…; आयुक्तांनी दिला इशारा
1

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! १० टक्के पाणीकपातीला सुरुवात; अपव्यय केल्यास…; आयुक्तांनी दिला इशारा

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?
2

Rapido पुण्यात मोठा झटका! बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नेमकं कारण काय?

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
3

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.