गंहुजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमला दिवंगत अजित पवारांचे नाव देण्याची आमदार सुनील शेळकेंची मागणी (फोटो- सोशल मीडिया)
मावळ तालुक्यातील गहुंजे येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा सभागृहात केली. मावळ तालुक्याच्या विकासासाठी आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ही मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : मुंबईच्या महापौर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; रितू तावडे यांचा लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास
गहुंजे येथील एमसीए मैदान हे राज्यातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते. या मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पार पडले असून त्यामुळे मावळ तालुक्याची ओळख देश-विदेशात निर्माण झाली आहे. या मैदानाच्या उभारणीसाठी आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभे राहू शकले, असे आमदार सुनील शेळके यांनी सभागृहात नमूद केले.
या मैदानामुळे स्थानिक युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत असून परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामने आणि इतर क्रीडा उपक्रम आयोजित होत असल्याने पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांनाही त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मैदानाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याला योग्य अशी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हे देखील वाचा : आसामच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालांची एन्ट्री; जाहीर केले 14 उमेदवारराज्य सरकारने या
गंहुजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानाला दिवंगत नेते अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही आमदार शेळके यांनी व्यक्त केली. तसेच या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






