Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध घटले की भेसळ थांबली? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या संकलनात घट

तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या दूध संकलनात घट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे "दूध उत्पादन घटले की आतापर्यंत दुधाच्या नावाखाली सुरू असलेली भेसळ थांबली?"

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2026 | 01:38 PM
दूध घटले की भेसळ थांबली? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या संकलनात घट

दूध घटले की भेसळ थांबली? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या संकलनात घट

Follow Us
Follow Us:

बारामती/अमोल तोरणे : दुधात पाणी मिसळूनही न थांबलेला भेसळीचा खेळ आता थेट रासायनिक पदार्थांपर्यंत पोहोचला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईनंतर काही दूध संघांच्या दूध संकलनात घट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे “दूध उत्पादन घटले की आतापर्यंत दुधाच्या नावाखाली सुरू असलेली भेसळ थांबली?”

 

दुधातील फॅट आणि एसएनएफचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. दूध अधिक काळ टिकावे, त्याचे प्रमाण वाढावे किंवा गुणवत्ता तपासणीमध्ये ते उत्तीर्ण व्हावे, यासाठी आरोग्यास घातक पदार्थांचा वापर होत असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. दूध विकून नफा कमावणाऱ्यांनी नागरिकांना विष पाजण्याचा परवाना घेतलेला नाही, असा संताप आता व्यक्त होत आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दूध संकलन केंद्रांपासून दूध संघांपर्यंत सुरू असलेल्या व्यवहारांची तपासणी होत आहे. संशयास्पद दूध नाकारले जात असल्यास त्याचा परिणाम संकलनाच्या आकडेवारीवर होणे स्वाभाविक आहे. मात्र, या घटत्या संकलनाचा नेमका संबंध दूध उत्पादकांच्या उत्पादनाशी आहे की भेसळीवर बसलेल्या चापाशी, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

कारवाई झाली की आकडे का घटतात?

जर दूध शुद्ध असेल, तर तपासणीला घाबरण्याचे कारण काय? आणि दूध संकलनात घट होत असेल, तर त्यामागील कारणे पारदर्शकपणे जनतेसमोर आणण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. गुणवत्तेच्या तपासणीला विरोध करणारे कोण आहेत, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे आणि भेसळीच्या या साखळीचा खरा सूत्रधार कोण? याचा शोध घेणे आवश्यक आहे. दूध हा केवळ व्यवसाय नाही; तो लाखो कुटुंबांच्या आरोग्याशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे दुधात रसायने मिसळणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत. संबंधित दूध संकलन केंद्रे, वाहतूकदार आणि दोषी दूध संघांचीही जबाबदारी निश्चित करावी.

हे सुद्धा वाचा : दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, धक्कादायक कारणही आलं समोर; चौघांना अटक

मुख्यमंत्री साहेब कोणालाही पाठीशी घालू नका

मुंढेंची कारवाई थांबविण्याऐवजी ती आणखी व्यापक करा. दूध कमी झाले तरी चालेल; पण नागरिकांच्या घरात ‘दुधाच्या नावाखाली विष’ पोहोचता कामा नये! दुधात भेसळ करणाऱ्यांना संरक्षण देणारेही तितकेच दोषी आहेत.आता दूध व्यवसायातील ‘पांढऱ्या’ आवरणाखालील काळा धंदा उघडकीस आणण्याची वेळ आली आहे. दूध भेसळी विरोधात तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये बड्या राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काहींनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. मात्र सर्वसामान्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांना पाठीशी घालू नये, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Milk collection has declined following the action initiated by tukaram mundhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • milk
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
1

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे
2

जनतेला पाण्याची चिंता, अहमदपूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर; अनेक तलाव कोरडे

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
3

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न
4

एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.