Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमची मुलं शाळेत सुरक्षित आहेत का? शाळांचे ‘सेफ्टी ऑडिट’ अनिवार्य करा; आमदार अमित गोरखेंची मागणी

आमदार अमित गोरखे यांनी राज्याच्या विधिमंडळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरला. गोरखे यांनी यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 14, 2026 | 02:46 PM
आमची मुलं शाळेत सुरक्षित आहेत का? शाळांचे 'सेफ्टी ऑडिट' अनिवार्य करा; आमदार अमित गोरखेंची मागणी

आमची मुलं शाळेत सुरक्षित आहेत का? शाळांचे 'सेफ्टी ऑडिट' अनिवार्य करा; आमदार अमित गोरखेंची मागणी

Follow Us
Follow Us:

पिंपरी चिंचवड : शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर, पण तिथे आपल्या मुलांची सुरक्षा नक्की किती आहे? हा गंभीर प्रश्न उपस्थित करत आमदार अमित गोरखे यांनी राज्याच्या विधिमंडळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरला. शाळांमधील ‘ICC’ आणि ‘POSH’ समित्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या समित्यांचे ‘ऑडिट’ करणे आणि शाळांना त्यांच्या सुरक्षेनुसार ‘रेटिंग’ देणे, यांसारख्या क्रांतिकारी मागण्या आमदार गोरखे यांनी केल्या.

 

आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. शाळांमधील सुरक्षा समित्या, स्वसंरक्षण शिक्षण आणि सुरक्षा मानके यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार गोरखे यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आमदार अमित गोरखे यांची भूमिका

आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली की, ICC आणि POSH समित्यांचे कामकाज केवळ कागदावर मर्यादित न राहता, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे शासनाकडून ‘ऑडिट रिपोर्ट’ घेणे अनिवार्य असावे. ज्याप्रमाणे हॉस्पिटल्सना दर्जा दिला जातो, तसे शाळांना त्यांच्या ‘सुरक्षा मानकांनुसार’ रेटिंग देण्यात यावे, जेणेकरून पालकांना सुरक्षित शाळा निवडता येईल. ‘गुड टच-बॅड टच’ आणि ‘सेल्फ-डिफेन्स’चे शिक्षण अनिवार्य अभ्यासक्रमाचा भाग असावे. प्रत्येक शाळेत प्रशिक्षित ‘काउन्सलर’ (समुपदेशक) असणे बंधनकारक करावे.

शिक्षणमंत्र्यांनी दिली स्पष्ट ग्वाही

आमदार गोरखे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शाळांमधील सुरक्षेसाठी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शाळा आणि बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असून कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक आहे. मुलींच्या स्वच्छतागृहाजवळ केवळ महिला कर्मचारी आणि माध्यमिक शाळांमध्ये ‘पिंक रूम’ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत ‘सती सावित्री समिती’ आणि तक्रार निवारण पेटीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे धडे सुरू करण्यात आले असून सायबर सुरक्षेचे शिक्षण दिले जात आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले, शिक्षणमंत्र्यांनी माझ्या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक पावले उचलली आहेत, हे स्वागतार्ह आहे. मात्र, पालकांना विश्वास वाटेल अशी सुरक्षित शाळा व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे. या निर्णयांची केवळ घोषणा न होता, त्यांची कठोर अंमलबजावणी होण्यासाठी माझा सतत पाठपुरावा राहील.

हे सुद्धा वाचा : देशाचे संविधान बदलून भारत बनवण्याचा भाजप अन् RSS चा डाव हाणून पाडा; काँग्रेसचे आवाहन

Web Title: Mla amit gorkhe has raised the issue of student safety in the state legislature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • dada bhuse
  • Minister Dada Bhuse

संबंधित बातम्या

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
1

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
2

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त
3

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
4

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.