Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधान भवन येथे भेट घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2026 | 01:52 PM
आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली 'ही' मोठी मागणी

आमदार सदाभाऊ खोत यांनी घेतली मंत्री विखे पाटलांची भेट; केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

इंदापूर : उजनी जलाशयासाठी संपादीत करण्यात आलेल्या मात्र प्रत्यक्षात न वापरल्या गेलेल्या जमिनींवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवून त्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधान भवन येथे भेट घेतली आहे.

 

उजनी धरण उभारणीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड व कर्जत तालुक्यातील तब्बल ८१ गावांतील शेतकऱ्यांनी आपली घरे व सुपीक जमिनी शासनाला दिल्या. मात्र अनेक धरणग्रस्तांचे आजपर्यंत संपूर्ण पुनर्वसन झालेले नाही. संपादीत जमिनींपैकी अनेक क्षेत्रांमध्ये प्रत्यक्षात धरणाचे पाणी पोहोचत नसल्याने उन्हाळ्यात पाणीपातळी घटल्यानंतर शेतकरी त्या जमिनीवर गाळपेर व जनावरांसाठी चारा पिकांची लागवड करतात. अशा जमिनी अतिक्रमण म्हणून जप्त करून पी.पी.पी. किंवा बी.ओ.टी. तत्वावर खाजगी कंपन्यांना देण्याचा निर्णय धरणग्रस्तांवर अन्यायकारक ठरत असल्याचे खोत यांनी नमूद केले.

महसूल व वन विभागाच्या १० ऑक्टोबर १९७३ व १९ ऑगस्ट १९७४ च्या शासननिर्णयानुसार, ज्या जमिनी मूळ उद्देशासाठी वापरल्या जात नाहीत त्या मुळ मालकांना परत देणे किंवा भाडेकराराने देण्याची तरतूद असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका दर्शवित लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार खोत यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

नोटीसा तात्काळ रद्द करण्याची मागणी

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात, अशी ठाम मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली. उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पुणे येथे लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली असून, या बैठकीत तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : कारवाईत बेजबाबदारपणा करणाऱ्यांवरच दंडुका; महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली तंबी

Web Title: Mla sadabhau khot has met minister radhakrishna vikhe patil in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Farmers
  • Minister Vikhe Patil
  • sadabhau khot news

संबंधित बातम्या

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
1

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा
2

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प
3

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार;  मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड
4

Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार; मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.