Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सव, दहीहंडीत अंगविक्षेप कृष्णाला व गणपतीला आवडेल का? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

अर्धनग्न अवस्थेमध्ये जर का महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करत असतील, तर हे श्रीकृष्णला तरी आवडणार आहे का? गणपतीला तरी आवडणार आहे का? याचा विचार मंडळांनी, कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवा, असेही मेधा कुलकर्णी यांनी स्पष्टपणे सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2026 | 04:43 PM
गणेशोत्सव, दहीहंडीत अंगविक्षेप कृष्णाला व गणपतीला आवडेल का? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

गणेशोत्सव, दहीहंडीत अंगविक्षेप कृष्णाला व गणपतीला आवडेल का? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावा
  • गणेशोत्सव, दहीहंडीत अंगविक्षेप कृष्णाला व गणपतीला आवडेल का? 
  • खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णींचा परखड सवाल
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची ओळख असून, पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ‘पुणे पॅटर्न’ तयार करावा. कोणत्याही जाती-धर्माचा सण, उत्सव असला, तरी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. डीजे, प्लाझ्मा, लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी आणावी,” असे परखड मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. अर्धनग्न अवस्थेमध्ये जर का महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करत असतील, तर हे श्रीकृष्णला तरी आवडणार आहे का? गणपतीला तरी आवडणार आहे का? याचा विचार मंडळांनी, कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “गेल्या अनेक वर्षांपासून डीजे, गोंगाट आणि उत्सवाला गालबोट लावणाऱ्या गोष्टींविरोधात भूमिका मांडत आले आहे. त्यामुळे केवळ गणेशोत्सवच नाही, तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही डीजेचा दणदणाट बंद व्हावा, असे मला वाटते. सण-उत्सवांच्या काळात वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजेमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, उच्च रक्तदाब व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तीव्र त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे उत्सव साजरा करत असताना या सगळ्याचा अवश्य विचार व्हायला हवा. गोंगाटामुळे उत्सवाच्या काळात नागरिकांना शहरातून स्थलांतरित होण्याची वेळ येऊ देऊ नये. न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेशोत्सवाच्या काळात गुटख्याच्या किंवा आरोग्यास घातक असणाऱ्या उत्पादनांच्या सरोगेट (छुप्या) जाहिराती स्वीकारु नयेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “लोकमान्य टिळक यांनी समाजप्रबोधनाच्या उद्देशाने गणेशोत्सव सार्वजनिक केला. यामध्ये व्याख्याने, वैचारिक देवाणघेवाण, मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या समाजासाठी उपयुक्त गोष्टी व्हायला हव्यात. पुण्यातील बरीच मंडळे अशाप्रकारे प्रबोधनपूर्ण उत्सव साजरा करतात. अशा मंडळांचा आदर्श सर्वानी घ्यावा. पुण्यातील सुमारे २०० गणेश मंडळांनी यंदा डीजे न वापरता विधायक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे अनुकरण इतर मंडळांनीही करावे आणि हा उत्सव समाजातील सगळ्यांनाच सुसह्य कसा होईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे.”

हे सुद्धा वाचा : पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

अश्लील गाणी, धर्माला न शोभणारे वर्तन अशाप्रकारे उत्सव साजरे करु नयेत. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करताना सभ्यता राखावी आणि सर्वसामान्य पुणेकरांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपल्या देशात ध्वनीप्रदूषणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते, इतर देशांत मात्र पर्यावरण जपण्यासाठी कडक नियम आहेत. आपल्या देशात मात्र पर्यावरणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसते. मात्र पर्यावरण, प्रदूषण याबाबत वैयक्तिक स्तरावर आणि सार्वजनिक स्तरावरही प्रत्येकाने योग्य पद्धतीने विचार आणि कृती करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

काही जागरूक नागरिकांनी मांडलेली भूमिका समाजाच्या हिताची आहे. त्यामुळे ते आस्तिक आहेत की नास्तिक आहेत, याच्याशी संबंध जोडता कामा नये. गणेश मंडळांनी पुणेकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. लोकप्रतिनिधींनी उत्सवांचे स्वरूप, नागरिकांना होणारा त्रास समजून घेत सुज्ञपणे भूमिका मांडायला हव्यात. प्रशासनानेही योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी करावी. – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यसभा खासदार.

Web Title: Mp medha kulkarni has stated her position regarding dj sound systems during the ganeshotsav festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • ganesh utsav
  • Medha Kulkarni
  • pune news

संबंधित बातम्या

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’
1

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’

Maharashtra Breaking News Today 2026:  दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
2

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार
3

बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क
4

काळजी घ्या ! पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य विभाग सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.