Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच तुकाराम मुंढेंना आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.

  • By विवेक
Updated On: Sep 10, 2026 | 06:28 PM
MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची रोहित पवारांची मागणी
  • तुकाराम मुंढेंना MPSC अध्यक्ष करण्याची मागणी
  • ‘पुराव्यांचा पार्ट-2 येणार’; सत्ताधारी आमदारांना आंदोलनाचं आवाहन
 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार रोहित पवार यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. भीमनवार यांनी, ‘MPSC पेपरफुटी प्रकरणात माझ्याविरुद्ध पुरावे दाखवा, मी पायउतार होईल’, असं म्हटल्यानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

रोहित पवार यांनी भीमनवार यांच्या महापरिवहन विभागातील कार्यकाळातील तक्रारी, कथित गैरव्यवहार आणि घोटाळ्यांबाबत माहिती समोर ठेवली. याचबरोबर, भीमनवार यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली असेल तर त्याची चौकशी का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘मुख्यमंत्र्यांनी भीमनवारांचा राजीनामा घ्यावा’

‘मुख्यमंत्र्यांनी भीमनवारांचा राजीनामा घ्यावा’, अशी मागणी करत रोहित पवार म्हणाले की, कारवाई झाली नाही तर भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्यामुळे त्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा संदेश समाजात जाईल. दरम्यान, पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी भेट घेतली. यावरूनही रोहित पवारांनी पाचपुते यांच्यावर टीका केली. ‘भाजपकडून कोणीतरी आलं होतं तुमच्याशी बोलायला, त्यांची फजिती झाली,’ असा टोला त्यांनी लगावला.

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

रोहित पवारांनी अमित शहा यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. चाणक्यांचा फोटो दाखवत, ‘बरेच लोक चाणक्य असल्याचं सांगतात, त्यांचं तरी ऐका,’ असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

यावेळी रोहित पवारांनी सत्ताधारी आमदारांनाही थेट आव्हान दिलं. ‘या माणसाचा राजीनामा व्हायला पाहिजे. सत्ताधारी आमदारांनी यावं, मी चर्चा करायला तयार आहे,’ असं म्हणत त्यांनी विक्रम पाचपुते यांना विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. इतकंच नाही तर, भीमनवारांविरोधातील पुराव्यांचा ‘पार्ट-2’ देखील येणार, असा दावा रोहित पवारांनी केला.

तुकाराम मुंढेंना MPSC अध्यक्ष करा

दरम्यान, MPSC च्या अध्यक्षपदासाठी तुकाराम मुंढे योग्य ठरू शकतात, असा दावा रोहित पवारांनी केला. अध्यक्षपदाच्या अटी तपासल्या असून त्या निकषांनुसार तुकाराम मुंढे अध्यक्ष होऊ शकतात, असं सांगत मुंढेंना MPSC आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली.

MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांच्या भवितव्याशी हा विषय जोडलेला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे.

Supreme Court Notice To UP Govt: माजी आमदारांना निवृत्तीवेतन कशासाठी? सर्वोच्च न्यायालयाची उत्तर प्रदेश सरकारला नोटीस!

Web Title: Mpsc paper leak rohit pawar vivek bhimnawar resignation tukaram mundhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • pune news
  • rohit pawar
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटीवर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची’, आत्महत्येच्या धमकीचा फोन ?
1

Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटीवर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची’, आत्महत्येच्या धमकीचा फोन ?

Katraj Dairy Milk Price Hike: ११ सप्टेंबरपासून दुधाला नवा खरेदी दर; कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ
2

Katraj Dairy Milk Price Hike: ११ सप्टेंबरपासून दुधाला नवा खरेदी दर; कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

BARTI Pune Contract Scam News: बार्टीच्या कंत्राटात गंभीर अनियमिततेचा आरोप; एकाच कंपनीला ९ वेळा मुदतवाढ
3

BARTI Pune Contract Scam News: बार्टीच्या कंत्राटात गंभीर अनियमिततेचा आरोप; एकाच कंपनीला ९ वेळा मुदतवाढ

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?
4

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.