Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…

बायकोशी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात घेऊन तो घराबाहेर पडला अन् थेट रेल्वे रुळांच्या दिशेने गेला. काही क्षणांत समोरून आलेल्या दुरांतो एक्स्प्रेसवर त्याने दगडांचा मारा केला; मात्र सीसीटीव्हीने त्याचा हा कारनामा टिपला आणि अखेर आरपीएफने नागपुरातून त्याला जेरबंद केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 03:01 PM
Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच...

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच...

Follow Us
Follow Us:
  • बायकोशी भांडणाचा राग दुरांतो एक्स्प्रेसवर काढला
  • बोरखेडीजवळ धावत्या ट्रेनवर दगडफेक
  • सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी नागपुरातून अटकेत
 

पुणे : बायकोशी झालेल्या वादाचा राग मनात धरून धावत्या नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्धा जिल्ह्यातील बोरखेडी रेल्वे स्थानक परिसरात २५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी नरेंद्रकुमार सिरसा याला नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकातून अटक केली.

बोरखेडीजवळ दुरांतोवर अचानक दगडफेक

नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर बोरखेडी रेल्वे स्थानक परिसरातून जात असताना अचानक दगडफेक करण्यात आली. धावत्या ट्रेनवर दगडांचा मारा झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. या घटनेत मोठी जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा माग काढला

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरपीएफने तातडीने तपास सुरू केला. बोरखेडी नगर पंचायत परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी एक संशयित व्यक्ती रेल्वे रुळांच्या दिशेने जाताना दिसून आली. या फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, दगडफेकीनंतर आरोपी नागपूर शहरात पळून आल्याची माहिती आरपीएफला मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने ऑटोमोटिव्ह चौक परिसरात सापळा रचून नरेंद्रकुमार सिरसा याला ताब्यात घेतले.

बायकोशी भांडण झाले अन् राग ट्रेनवर काढला

चौकशीदरम्यान आरोपीने दगडफेक केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या दिवशी पत्नीशी जोरदार भांडण झाले होते. या कौटुंबिक वादामुळे तो संतापलेला होता. त्यानंतर रागाच्या भरात रेल्वे रुळांच्या दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे. नरेंद्रकुमार सिरसा हा मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असून, नागपुरात बांधकाम क्षेत्राशी संबंधित इस्त्री आणि मजुरीची कामे करतो. धावत्या रेल्वेवर दगडफेक केल्याप्रकरणी त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Nagpur mumbai duronto express stone pelting wife quarrel accused arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Arrested
  • central railway
  • express news
  • pune crime case
  • RPF
  • stone pelting

संबंधित बातम्या

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड
1

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली
2

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…
3

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
4

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.