Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली ‘ही’ आग्रही मागणी

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर केल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 02:55 PM
विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली 'ही' आग्रही मागणी

विधानपरिषदेसाठी दीपक मानकर यांनी ठोकला शड्डू; भाजपकडे केली 'ही' आग्रही मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे/निखील सुक्रे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर केल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी निवडणूक लढवण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. तसेच महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी भाजपकडे केली आहे.

 

पुणे जिल्हा आणि शहरातील पक्षीय संख्याबळ काय सांगते?

पुणे शहर आणि जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समिती अशा एकूण २३ स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्थांमधील विद्यमान नगरसेवक आणि सदस्यांचे पक्षीय संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असल्याचे दिसते.

पक्षनिहाय सदस्य व नगरसेवक संख्या

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ३४४
भारतीय जनता पक्ष (BJP) – ३०५
शिवसेना (शिंदे गट) – ६८
महायुती / इतर स्थानिक आघाड्या – २३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – १९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) – १७
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ११
अपक्ष – २३

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक (३४४) नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी असल्याने संख्याबळाच्या जोरावर ही जागा नैसर्गिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच ठरते, असा दावा मानकर यांनी केला आहे.

…तर हीच दादांसाठी खरी श्रद्धांजली असेल – दीपक मानकर

आपली उमेदवारी आणि हक्काबाबत अधिक स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, मी निश्चितपणे या विधान परिषद निवडणुकीसाठी पूर्णपणे इच्छुक आहे. ही जागा मूळची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे. आम्ही नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचे धर्म पाळत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे आता भाजपने ही जागा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडायला हवी. “या संदर्भात मी पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची अधिकृत मागणी केली आहे. पक्षात अनेक जण इच्छुक असले, तरी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पक्षासाठी केलेले ग्राउंड वर्क पाहता पक्षाने मला संधी द्यावी. या निवडणुकीत भाजपने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडणे, हीच खरी दादांसाठी श्रद्धांजली ठरेल.”

हे सुद्धा वाचा : बारामती पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश, सात आरोपी जेरबंद; तब्बल…

निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुतीमध्ये पुण्याची ही प्रतिष्ठेची जागा कोणाच्या पदरात पडते, भाजप दीपक मानकर यांच्या या मागणीवर आणि संख्याबळाच्या दाव्यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ncp leader deepak mankar is willing to contest the legislative council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • BJP
  • NCP News
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
2

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
3

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
4

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.