Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएमपीच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार; राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे-पाटील यांच्या मागणीला यश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनाने सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 05:08 PM
पीएमपीच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार; राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे-पाटील यांच्या मागणीला यश

पीएमपीच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार; राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे-पाटील यांच्या मागणीला यश

Follow Us
Follow Us:
  • पीएमपीच्या सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
  • विनयभंग, चोरी अन् अपघातांवर नियंत्रणासाठी निर्णय
  • राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे-पाटील यांच्या मागणीला यश
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील विनयभंग, चोरी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

 

सुरवसे-पाटील यांनी एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना लेखी निवेदन देऊन सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत उर्वरित बसमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. सध्या पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे सुरवसे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बसमधील गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींची ओळख पटविणे आणि पुरावे गोळा करणे कठीण जात होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी कारवाईत अडचणी येत होत्या.

सध्या वातानुकूलित तसेच नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे. आता उर्वरित जुन्या बसमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच बसमधील सीसीटीव्ही फुटेजचे प्रभावी निरीक्षण व देखरेख करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेत अधिकाऱ्यांची मनमानी; शेतकऱ्यांची बँक खाती गोठवली

व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याबद्दल सुरवसे-पाटील यांनी त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बसमधील विनयभंग, चोरी आणि इतर गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : पावसाळ्यात पाणी साचल्यास अधिकाऱ्यांची खैर नाही! महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आक्रमक

Web Title: Ncp leader rohan survase patil demand has met with significant success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • cctv cameras
  • PMPML Bus
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
1

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Ganeshotsav: ना दरवाढ, ना हाल! गणेशोत्सवात पुणेकरांचा प्रवास होणार सोपा; PMP चा मोठा दिलासा
2

Ganeshotsav: ना दरवाढ, ना हाल! गणेशोत्सवात पुणेकरांचा प्रवास होणार सोपा; PMP चा मोठा दिलासा

बालाजी चौक परिसरातील मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक; महापालिका प्रशासनाला दिला इशारा 
3

बालाजी चौक परिसरातील मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक; महापालिका प्रशासनाला दिला इशारा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.