मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक; व्यक्त केला शोक (photo Credit- X)
Baramati, Maharashtra: Activist Manoj Jarange Patil arrives at Vidya Pratishthan. pic.twitter.com/lE1DCCC1R0 — IANS (@ians_india) January 28, 2026
अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील चांगलेच भावूक झाले. ते म्हणाले, अजितदादा म्हणजे या राज्याचा आणि राज्यातील गोरगरिबांचा मोठा आधार होते. जे मनात असायचे तेच ते स्पष्ट बोलायचे. असा सडेतोड नेता आता पुन्हा होणे नाही. दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या जाण्याने समाजाचे आणि राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “या कठीण काळात आम्ही पवार कुटुंबासोबत आहोत. त्यांचे दुःख बघवत नाही, आज शब्दही फुटत नाहीयेत.”
Ajit Pawar Funeral: अजित पवारांचे पार्थिव कुठे ठेवणार? शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची तयारी
दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितच्या निधनामुळे महाराष्ट्राची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही. हा निव्वळ एक दुर्दैवी अपघात होता, यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असे म्हणत त्यांनी अफवांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार स्वतः बारामतीत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या खाजगी विमानाचे नियंत्रण सुटले आणि लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. जमिनीला धडकताच विमानाने पेट घेतला, ज्यामध्ये अजित पवारांसह दोन वैमानिक आणि दोन अंगरक्षकांचा मृत्यू झाला.






