53 व्या अखिल भारतीय एफसीआय आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेत अपराजित राहून उपांत्य फेरी गाठणारा उत्तर विभाग पहिला संघ ठरला
पुणे : रविवारी होणाऱ्या पश्चिम विभाग विरुद्ध ईशान्य विभाग यांच्यातील लढतीतून उपांत्य फेरीतील दुसऱ्या संघावर शिक्कामोर्तब होईल. आशुतोष थापलियालने (19’) उत्तर विभागाचे गोल खाते उघडले. सहा मिनिटांनी जोएल बेकहॅम सायमनने (25’) त्यात भर घातली. त्यामुळे मध्यंतराला उत्तर विभागाकडे 2-0 अशी आघाडी होती.
उत्तरार्धात, भरण्यू बन्सलने (43’) उत्तर विभागाला 3-0 असे आघाडीवर नेले. एस. चिनमुअंथांगने (63’) ईशान्य विभागासाठी गोल करताना थोडा फरक कमी केला तरी प्रतिस्पर्धी संघाने 3-1 अशा फरकाने बाजी मारली. दिवसभरातील अन्य सामन्यात पूर्व विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. या बरोबरीसह पूर्व विभागाला 2 सामन्यांत (दोन्ही बरोबरी) तितकेच (2) गुण मिळवता आले.
रविवारी खेळल्या जाणाऱ्या मुख्यालय विरुद्ध दक्षिण विभाग सामन्यातून उपांत्य फेरीचा दुसरा संघ निश्चित होईल.
निकाल :
पूर्व विभाग: 0 बरोबरी वि.दक्षिण विभाग: 0
उत्तर विभाग: 3 (आशुतोष थापलियाल 19’, जोएल बेकहॅम सायमन 25’, भारन्यू बन्सल 43’) विजयी वि. ईशान्य विभाग: 1 (एस. चिनमुआंथांग 63’)