Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका निवडणुकीत बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या; ओबीसी संघटनांचा आरोप

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत ५२ जागा बनावट ओबीसी मराठ्यांनी बळकावल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 22, 2026 | 01:21 PM
महापालिका निवडणुकीत बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या; ओबीसी संघटनांचा आरोप

महापालिका निवडणुकीत बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या; ओबीसी संघटनांचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:
  • बनावट कुणबी प्रमाणपत्राद्वारे डल्ला
  • बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या
  • ओबीसी संघटनांचा आरोप
पुणे : इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी देण्यात आलेल्या आरक्षणावर बनावट कुणबी प्रमाण पत्राद्वारे मराठा समाजाकडून डल्ला मारला जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत ५२ जागा बनावट ओबीसी मराठ्यांनी बळकावल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे. संघटनांचे प्रतिनधी मृणाल ढोले-पाटील, मंगेश ससाणे, सुरेश गायकवाड आणि आनंदा कुदळे यांच्यासह इतरांनी पत्रकार परीषदेत सदर आराेेप केला आहे.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी असलेले सुमारे 27 टक्के आरक्षणही सत्ताधारी व. प्रबळ मराठा समाजाकडून ‘कुणबी’ म्हणून स्वतःला दाखवून मोठ्या प्रमाणावर बळकावले जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार आणि प्राथमिक अभ्यासानुसार 66 ते 75 टक्क्यांपर्यंत ओबीसी आरक्षित जागांवर अशा प्रकारे अतिक्रमण झाले आहे. हा प्रकार म्हणजे सामाजिक न्यायाची थट्टा असून संविधानाच्या मूळ हेतूंवर थेट आघात आहे. अनेक ओबीसी कुटुंबांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूक लढवण्याची संधी ही आयुष्यातील एकमेव संधी असते; तीही योजनाबद्ध पद्धतीने हिरावून घेतली जात आहे, असं ओबीसी संघटनाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत, एकूण 165 जागांपैकी 44 जागा ओबीसींसाठी राखीव आहेत, मात्र त्यापकी 26 जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी स्वतःला ‘कुणबी’ दाखवून निवडणूक लढवली, आणि विजय मिळवला असल्याचा आरोप आहे. यामध्ये भाजपचे 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक असल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ जवळपास 60 टक्क्यांहून अधिक ओबीसी आरक्षित जागांवर प्रत्यक्ष ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व झालेले नाही. परिणामी ओबीसी समाजाच्या प्रश्नांना, गरजांना आणि मागण्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात योग्य स्थान मिळत नसल्याचे नमूद करण्यात आले. 60% ओबीसी आरक्षण गिळंकृत केले आहे, असा आरोप ओबीसीकडून केला आहे.

हे सुद्धा वाचा : हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थिती

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही अशीच परिस्थिती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथे एकूण 125 जागांपैकी 34 जागा ओबीसींसाठी राखीव आहेत; मात्र त्यापैकी 26 जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी ‘कुणबी’ म्हणून प्रवेश मिळवला आहे. यामध्ये भाजपचे 17, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आणि शिवसेना (शिंदे गट) चे 2 नगरसेवक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे ओबीसी समाजाचे सुमारे 76 टक्के प्रतिनिधित्व हिरावले गेले असून महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये ओबीसींचा आवाज जवळपास संपुष्टात आल्याची भावना ओबीसी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली. 76% आरक्षण मध्ये अतिक्रमण झाले आहे, असही संघटांनी सांगितले.

Web Title: Obc organizations have alleged that fake obc candidates were given candidature in the municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • OBC Reservation
  • PCMC Election 2026
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट
1

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ; नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट

महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण
2

महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध
3

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप
4

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.