Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकमताने चर्चा होण्याऐवजी काही शेतकरी नेते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येच खडाजंगी उडाल्याने बैठकीवेळी वातावरण तापले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 05:04 PM
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

Follow Us
Follow Us:

चाकण : राज्यभरात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात मिळणारा दर मात्र अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेण्याऐवजी काही राजकीय नेते व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्येच शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. अनेक शेतकऱ्यांना प्रतिकिलो मिळणारा दर हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी, वाहतूक खर्च आणि साठवणुकीचा वाढलेला खर्च लक्षात घेता कांदा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीवर चर्चा करून शासनावर दबाव निर्माण करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, बाजार समितीचे संचालक तसेच कांदा उत्पादक शेतकरी बैठकीस उपस्थित होते. सुरुवातीला कांद्याच्या दरवाढीसाठी आंदोलन उभारण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र काही वेळातच विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

यावेळी मागील काळात कोणत्या पक्षाने शेतकऱ्यांसाठी काय केले आणि कोणत्या पक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, यावरून वाद रंगला. काही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले. एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. उपस्थितांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले असले तरी बैठकीचा मूळ उद्देश काही काळ बाजूलाच पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. शेतकरी गंभीर आर्थिक संकटातून जात असताना राजकीय नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. कांद्याला हमीभाव मिळावा, बाजार हस्तक्षेप योजना प्रभावीपणे राबवावी, नाफेड व एनसीसीएफमार्फत मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी तसेच शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. बैठकीत झालेल्या वादामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. कांदा उत्पादकांच्या हितासाठी सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आगामी काळात कांदा दराच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत काही शेतकरी संघटनांनी दिले असून शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; ‘या’ नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

Web Title: Onion farmers are facing financial difficulties due to not getting good prices for their onions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Chakan News
  • Farmers
  • Onion News

संबंधित बातम्या

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक
1

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
3

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग; कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
4

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग; कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.