Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिळकतकरावरील दंड एक टक्क करा, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा स्थायी समितीला प्रस्ताव; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

मिळकत कराच्या थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारी शास्ती (दंड ) ही दाेन टक्क्यांऐवजी एक टक्का करावी असा प्रस्ताव विराेधी पक्षांच्या नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 12:50 PM
पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार

पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार

Follow Us
Follow Us:

पुणे : मिळकत कराच्या थकबाकीवर दरमहा आकारण्यात येणारी शास्ती (दंड ) ही दाेन टक्क्यांऐवजी एक टक्का करावी असा प्रस्ताव विराेधी पक्षांच्या नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे. सदर प्रस्तावावर सत्ताधारी भाजपकडून काय भुमका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विराेधी पक्षाकडून एक प्रस्ताव पुढे आणून सत्ताधारी भाजपची काेंडी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

 

यापुर्वी काॅंग्रेसचे गटनेते चंदू कदम यांनी पाचशे चाैरस फुट क्षेत्रफळाच्या घरांना मिळकत कर माफ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला हाेता. भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सदर घाेषणा केली हाेती. परंतु, प्रत्यक्षात काॅंग्रेसकडून यासंदर्भातील प्रस्ताव दाखल झाल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी झाली हाेती. त्यामुळे हा प्रस्ताव गुंडाळताना भाजपने अंदाजपत्रक सादर करताना पाचशे चाैरस फुटापर्यंत महिलांच्या नावावर असलेल्या घरांना मिळकत कर माफ केले. आता विराेधी पक्षाकडून आणखी एक प्रस्ताव पुढे आणून सत्ताधारी भाजपची काेंडी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

विराेधी पक्षातील नगरसेवक हर्षवर्धन मानकर, सुहास टिंगरे आणि स्वप्नील दुधाणे यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमाेर सादर केला आहे. महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींची थकबाकी असेल तर त्यावर दरमहा दाेन टक्के दंड आकारला जाताे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा दाेन्ही स्वरुपाच्या मिळकतींचा समावेश आहे. महापालिकेकडून माेठ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जात नाही. त्याचवेळी निवासी मिळकतदारांवर या दंडाचा भार वाढत आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट गावांतील मिळकतदारांना अद्याप मिळकत कराच्या पद्धतीविषयी पुरेशी माहीती नाही. तसेच या गावांत अद्याप नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात पुरविल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत समाविष्ट गावांतील मिळकतकराच्या थकबाकीवर दाेन टक्के दंड आकारणे हे सर्वसामान्यांना फटका देणारे आहे, असे नगरसेवकांनी प्रस्तावात नमूद केले आहे.

अभय याेजनेत दंडावर ७५ टक्के सवलत दिली गेली. त्यामुळे या याेजनेत ९२४ काेटी रुपये जमा झाले. दंड कमी केल्यास मिळकतदारांकडून कर भरण्यास प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट हाेत असल्याचा दावा प्रस्तावात केला गेला आहे.

दंड हा दरमहा दाेन टक्के आकारला जाताे, यामुळे वार्षिक दर हा २४ टक्के इतका हाेता. त्यामुळे दंडाची रक्कम वाढत जाते. त्याचा आर्थिक ताण लहान व मध्यम मिळकतधारक, ज्येष्ठ नागरीक, पगारदार वर्ग , लघू व्यावसाियकांवर येताे. त्यामुळे कर भरण्याची मानसिकता कमी हाेते असा दावाही केला गेला आहे.

हे सुद्धा वाचा : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँग्रेसकडून आकाश मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Web Title: Opposition corporators have submitted a proposal to the pune municipal corporation standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • NCP News
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
2

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
3

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
4

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.