Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये तयारी वेगात; देहू-आळंदी पंचक्रोशीला ‘संतभूमी’चा दर्जा देण्याची मागणी

Palkhi Yatra on Ashadi ekadashi: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदी–पंढरपूर पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्ह्यातील मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 18, 2026 | 08:40 PM
पालखी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये तयारी वेगात; देहू-आळंदी पंचक्रोशीला ‘संतभूमी’चा दर्जा देण्याची मागणी
Follow Us
Follow Us:
  • पालखी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये तयारी वेगात
  • देहू-आळंदी पंचक्रोशीला ‘संतभूमी’चा दर्जा देण्याची मागणी
  • भाविकांना आध्यात्मिक आणि मनोहारी अनुभव
पुणे शहर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघणाऱ्या आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण पुणे जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. वारकरी संप्रदायाच्या या महान आध्यात्मिक सोहळ्याच्या स्वागतासाठी विविध ऐतिहासिक आणि पौराणिक मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

‘श्रीमंत’ Dagdusheth बाप्पा ‘प्रेम मंदिरात’ विराजमान होणार; १०० फूट उंच अन्…, काय असणार खास?

बुधवार पेठेतील प्रसिद्ध पासोड्या विठ्ठल मंदिर परिसर तसेच मंदिरावरील प्राचीन शिल्पकला आणि मूर्तींना आकर्षक रंगसंगती देऊन सजविण्यात येत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक आध्यात्मिक आणि मनोहारी अनुभव मिळणार आहे.

याच पार्श्वभूमीवर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून देहू-आळंदी पंचक्रोशी क्षेत्राला अधिकृतपणे ‘संतभूमी’चा दर्जा देण्याची मागणी केली आहे. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेची केंद्रे असलेल्या श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन हा दर्जा देण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

आमदार जगताप यांनी सांगितले की, आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असून देहू हे संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने आणि वैकुंठगमनाने पावन झालेले क्षेत्र आहे. या दोन तीर्थक्षेत्रांदरम्यानचा सुमारे १६ किलोमीटरचा परिसर शतकानुशतके वारकरी परंपरा, हरिनाम संकीर्तन, अध्यात्म आणि संत साहित्याच्या समृद्ध वारशाचे केंद्र राहिला आहे. दरवर्षी लाखो वारकरी या मार्गावरून विठ्ठलभक्तीत तल्लीन होत पंढरपूरकडे प्रस्थान करतात.

उत्तराखंडला जसा ‘देवभूमी’चा मान प्राप्त आहे, त्याच धर्तीवर देहू-आळंदी परिसराला ‘संतभूमी’चा अधिकृत दर्जा मिळावा, अशी वारकरी समाज आणि स्थानिक नागरिकांची भावना असल्याचेही त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा गौरव वाढेल, तसेच या आध्यात्मिक वारशाचे संवर्धन, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठातही FDA चा दणका; कॅन्टीनचा अन्न परवानाच निलंबित, अन्नसुरक्षेतील आढळल्या गंभीर त्रुटी

Web Title: Palkhi yatra temple preparations dehu alandi sant bhoomi demand pune wari ashadhi ekadashi pilgrimage news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Latest pune news update
  • Pandharpur Vitthal Rukmini Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.