Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रवि लांडगे यांनी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 02:19 PM
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार
  • प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
  • नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविणार
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रवि लांडगे यांनी दिला. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर लांडगे आणि आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत ‘सात मावळे संवर्धन संस्था’तर्फे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नदीतील वाढते प्रदूषण रोखणे आणि सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

 

स्वच्छता मोहिमेदरम्यान महापौर लांडगे स्वतः नदीपात्रात उतरून कचरा उपसण्याच्या कामात सहभागी झाले. पाहणीदरम्यान नदीत साचलेला प्लास्टिक कचरा, औद्योगिक सांडपाणी व इतर घातक घटक आढळून आले. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

महापालिका हद्दीतून नदीत सोडले जाणारे प्रदूषित सांडपाणी व औद्योगिक कचऱ्यास जबाबदार आढळणाऱ्या कंपन्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून इंद्रायणी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : हडपसरमधील आगीबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती; तरुणाला घेतले ताब्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे स्मारक उभारण्याची सूचना केली होती, ज्याला सर्वच पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चिंचवड येथील डी-मार्ट समोर ३३.८६ एकर जागेवर महापालिकेची नवीन इमारत साकारत असून, त्यातील ८.६५ एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. महापौर रवि लांडगे यांनी या कामाची तातडीने संयुक्त पाहणी करून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाबद्दल महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून, हा निर्णय शहराच्या एकात्मतेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation mayor ravi landge is making efforts to clean the indrayani river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
1

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; ‘या’ तारखेपासून १० टक्के पाणी कपात
2

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; ‘या’ तारखेपासून १० टक्के पाणी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.