Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PNG Gas : गॅस टंचाईवर सरकारचा मास्टरप्लॅन; पुण्यात PNG GAS जाळ्याचा विस्तार, काय आहे शेवटची तारीख?

Pune PNG Gas Connection : पीएनजी गॅस जाळ्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे. घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी पीएनजीचा वापर वाढविणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 05:48 PM
PNG Gas Connections Launched for Domestic and Industrial Use Amidst LPG Shortage Pune News

PNG Gas Connections Launched for Domestic and Industrial Use Amidst LPG Shortage Pune News

Follow Us
Close
Follow Us:

Pune News Update : पुणे : आकाश ढुमेपाटील : आखाती युद्धकाळात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या (Gas Shortage) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले असून, त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग व औद्योगिक वसाहतींमध्ये पीएनजी गॅस जाळ्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे. घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी पीएनजीचा वापर वाढविणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात Maharashtra Natural Gas Limited मार्फत सेवा दिली जात असताना, ग्रामीण भागातील विस्तारीकरणाचे काम Torrent Gas या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. राज्य शासनाने घरगुती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या पीएनजी लाईन्स ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे देखील वाचा : काळजी घ्या ! उन्हाचा कडाका आणखी वाढणार; 16-17 एप्रिलला उष्णतेची लाट येण्याचा अंदाज

ग्रामीण भागात औद्योगिक वापरासाठी स्टील पाइपलाइन टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. खेडगाव ते शेवाळवाडी दरम्यान २५ किलोमीटर लांबीची औद्योगिक लाईन प्रस्तावित असून, त्यापैकी चार किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. राजगुरुनगर ते मंचर दरम्यान २० किलोमीटरची लाईन लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय सारोळा ते खेड शिवापूर (२० किमी), रांजणगाव एमआयडीसी (४५ किमी), बारामती एमआयडीसी (४० किमी), तळेगाव एमआयडीसी (१५ किमी) आणि सणसवाडी एमआयडीसी (१० किमी) या भागांत पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील गॅस उपलब्धता सुलभ होऊन उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे देखील वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; कोयना जलाशयावरील पुलांची केली पाहणी

घरगुती वापरासाठीही विविध भागांत कामे सुरू आहेत. वाघोली येथे १५ किमीचे काम सुरू असून, बारामतीमध्ये आधीच्या १५ किमी व्यतिरिक्त आणखी ३० किमी लाईन टाकली जाणार आहे. फुरसुंगी येथे ५ किमी, शिरूर येथे विद्यमान ५ किमीवरून १० किमीपर्यंत वाढ, राजगुरुनगर येथे ४ किमीवरून १० किमीपर्यंत विस्तार, बावधन येथे २ किमीवरून ७ किमीपर्यंत वाढ, तर सासवडमध्ये ३० किमीवरून आणखी १० किमी वाढविण्याचे काम सुरू आहे. तसेच केडगाव ते जेजुरी दरम्यान ३७ किमीची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, ते पुढील एका वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, रस्त्यालगत पाइपलाइन टाकताना स्थानिकांकडून अनेकदा अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र होते. मात्र, केंद्र सरकारच्या परिपत्रकानंतर या कामांना मिळणारा विरोध कमी झाला असून, राज्य शासनाकडूनही सहकार्य वाढल्याने प्रकल्पांना गती मिळत आहे.

एकूणच, पीएनजी जाळ्याच्या या व्यापक विस्तारामुळे ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसह औद्योगिक क्षेत्रालाही स्वस्त, सुरक्षित आणि सातत्यपूर्ण गॅसपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Png gas connections launched for domestic and industrial use amidst lpg shortage pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Gas Shortage
  • pune news
  • World War 3

संबंधित बातम्या

Lebanon Ceasefire : ट्रम्प निमित्त मात्र, किंगमेकर सलमान! सौदीच्या एका फोनने इस्रायलची बंदूक म्यान; लेबनॉनमध्ये शांतता
1

Lebanon Ceasefire : ट्रम्प निमित्त मात्र, किंगमेकर सलमान! सौदीच्या एका फोनने इस्रायलची बंदूक म्यान; लेबनॉनमध्ये शांतता

पुण्यातील अनधिकृत होर्डिंग आता पाडली जाणार; महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर
2

पुण्यातील अनधिकृत होर्डिंग आता पाडली जाणार; महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर

बाजारात हापूस आंब्यांचा दर तेजीतच; उत्पादन घटले अन् मागणी वाढली
3

बाजारात हापूस आंब्यांचा दर तेजीतच; उत्पादन घटले अन् मागणी वाढली

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
4

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.