Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 25, 2026 | 12:02 PM
घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. बेगमपुरा पोलिसांनी तपास करुन आरोपीला नेवासा (जि. अहिल्यानगर) येथून बेड्या ठोकल्या आहेत. राजू माळी असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

३५ वर्षीय विवाहिता पतीसह मजुरी करून उदरनिर्वाह करते. काही महिन्यांपूर्वी ऊसतोडीच्या कामासाठी गंगापूर येथे गेल्यानंतर तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्राम व मोबाइलवरून संपर्क सुरू होता. १५ जुलै रोजी पीडितेचा सावत्र भाऊ उपचारासाठी घाटीत दाखल असल्याने पीडिता तेथे गेली होती. रात्री नऊच्या सुमारास आरोपीने फोन करून आपण घाटीतच असल्याचे सांगितले. काही वेळाने पीडिता पिण्याचे पाणी आणण्यासाठी खाली गेल्यानंतर आरोपी तेथे आला.

आपले फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन, अशी धमकी देत त्याने पीडितेला सोबत येण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने पीडितेचा मोबाइल हिसकावून घेतला. दुचाकीवर बसवून रात्रभर प्रवास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पवनचक्क्या असलेल्या परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे तु माझ्या सोबत लग्न कर असे म्हणून त्याने पीडितेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली.

विवाहितेला डांबून ठेवत केला अत्याचार

पीडितेने नकार देत विरोध केला माञ आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. सलग दोन दिवस पीडितेला शेडमध्ये डांबुन ठेवत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. १७ जुलै रोजी सकाळी पीडितेने मुलांची आठवण येत असल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने तिला नेवासा येथे आणून बसमध्ये बसवले. तसेच पुन्हा आपल्याकडे आली नाही तर तिला व तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले

पोलिस ठाणे गाठून केला पीडितेने गुन्हा दाखल

गावी परतल्यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी हा नेवास येथे असल्याची माहिती मिळताच केदारे यांच्या पथकाने राजू माळी याला नेवास्यातून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मनिषा केदार करीत आहेत.

Web Title: A shocking incident involving the abduction of a woman from the ghati area has occurred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
1

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.