
‘पुणे दर्शन’ बससेवेच्या धर्तीवर आता ‘पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन बस सुरू
५०० रुपयांत घडणार १० प्रमुख प्रेक्षणीय स्थळांची सफर
१० जून २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार सेवा
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) कडून प्रसिद्ध ‘पुणे दर्शन’ बससेवेच्या धर्तीवर आता ‘पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन (बससेवा क्र. २)’ सुरू करण्यात येत आहे. ही सेवा १० जून २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत सुरू होईल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सूचनेनंतर या सेवेची सुरूवात करण्यात येत असून एक दिवसीय विशेष ‘पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शनासाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये इतके तिकीट असणार आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी ही बस सकाळी दोन प्रमुख ठिकाणांवरून सुटेल. पहिली बस पुणे स्टेशन डेपो येथून सकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि रात्री ७ वाजता परत येईल. तर दुसरी बस डेक्कन जिमखाना बस स्थानकावरून सकाळी ८ वाजता सुटेल आणि सायंकाळी ६.३० वाजता पर्यटकांना घेऊन परत पोहोचेल.
पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल, बस थेट दुकानातच…
या १० प्रमुख पर्यटन स्थळांचा समावेश
या एक दिवसीय पर्यटनात दोन्ही शहरांतील महत्त्वाच्या १० धार्मिक, ऐतिहासिक व मनोरंजक स्थळांची सफर घडवली जाईल.यामध्ये चिंचवड येथील सायन्स पार्क (सोमवार बंद), रावेत येथील इस्कॉन मंदिर, चाफेकर बंधू स्मारक (बाह्य दर्शन) आणि श्री मोरया गोसावी मंदिर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.तसेच शहरातील प्रसिद्ध चतुःशृंगी माता मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, शिवाजीनगर येथील एव्हिएशन गॅलरी, सारसबाग गणपती मंदिर, महालक्ष्मी मंदिर (बाह्य दर्शन) आणि पु. ल. देशपांडे उद्यान या प्रेक्षणीय स्थळांनाही भेट दिली जाणार आहे.
Pune PMPML News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल
गाईडची सुविधा आणि तिकीट बुकिंग
पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी पीएमपीकडून बसमध्ये विशेष गाईडची (मार्गदर्शक) नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रवासाचे तिकीट नागरिकांना पीएमपीच्या डेक्कन जिमखाना बसस्थानक आणि मोलेदिना बसस्थानक (पुणे स्टेशन) या दोन्ही ठिकाणांवरून आगाऊ बुक करता येईल.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाते. मात्र दररोज ५४ बसेस ब्रेकडाऊनमुळे बंद पडत आहेत. या बससेवेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे चित्र समोर येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात सेवा देणाऱ्या पीएमपीच्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.