Pune PMC News : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखाली वाचा : PMP पर्यटन बसला जोरदार प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग, उत्पन्न ६८ लाखांवर
मागील २०२४,२०२५ आणि मार्च २०२६ पर्यत पीएमपीच्या तब्बल ४४ हजार ३०४ वेळा बस ब्रेकडाऊन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बस ३१ हजार ९०२ वेळा, तर पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या बस १२ हजार ४०२ वेळा बंद पडल्या आहेत. याचा सरासरी विचार करता दररोज सुमारे ५४ बस बंद पडत असल्याचे स्पष्ट होते. या सततच्या बिघाडामुळे कामावर, शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे.वेळेवर पोहोचणे कठीण झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रेकडाऊनच्या घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बसांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षे तीन महिन्यांत या बस ३१ हजार ९०२ वेळा रस्त्यावर बंद पडल्या आहेत. संबंधित ठेकेदारांवर नियमांनुसार किलोमीटरप्रमाणे आर्थिक दंड आकारला जात असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी पीएमपी प्रशासनाकडून बसची नियमित तपासणी आणि प्रिव्हेन्टिव्ह मेंटेनन्सवर भर दिला जात असून, येत्या काळात ब्रेकडाऊनची संख्या कमी होईल असे सांगितले आहे.
प्रवाशी प्रकाश वाघमारे यांनी तक्रार केली होती की, काल अचानक बस बंद पडल्यामुळे माझे कोणतेही काम वेळेवर झालेले नाही. पर्यायी व्यवस्था देखील लवकर करून देण्यात आली नव्हती,येणारी प्रत्येक बस हे भरून येत होती त्यामुळे आमचे हाल झाले. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावे.
| वर्ष | पीएमपी | भाडेतत्वावरील |
|---|---|---|
| २०२४ | ६,२६१ | १४,७६२ |
| २०२५ | २०५२ | १३,६९८ |
| २०२६ (मार्च पर्यंत) | १०८९ | ३,४४२ |
हे देखील वाचा : Pune News : शहरात रिक्षा चालकांची मनमानी कायम; आरटीओच्या कारवाईचा परिणाम शून्य
PMC पर्यटन बससेवेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सेवेमुळे यंदा सर्वाधिक ६८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या पर्यटन बसमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांपैकी सुमारे ७० टक्के प्रवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. १ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.






