Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया ‘आयएस’ अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!

Fake IAS Officer: पुण्यातील बाणेरमधून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. अवघा बारावी पास असलेल्या २१ वर्षीय तरुणाने आपण 'आयएस' अधिकारी असल्याचे भासवून सोसायटीचा चेअरमन पद बळकावले. म्हाडाच्या लॉटरीचे आमिष दाखवून आणि बँकेच्या ठेवीवर परस्पर कर्ज काढून ३५ लाखांचा अपहार करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला बाणेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 10:58 AM
Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया 'आयएस' अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!

Fake IAS Officer: बारावी पास तरुण निघाला तोतया 'आयएस' अधिकारी; चेअरमन बनून सोसायटीला चुना लावत केला लाखांचा अपहार!

Follow Us
Follow Us:
  • बारावी पास तरुणाचा ‘आयएएस’ अधिकाऱ्याचा बनाव
  • म्हाडाच्या फ्लॅटचे आमिष व ३५ लाखांचा अपहार
  • सोसायटी खजिनदारांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
Fake IAS Officer: पुण्यातील बाणेर परिसरातून एका अत्यंत धक्कादायक आणि चक्क डोळे विस्फारणाऱ्या फसवणुकीची घटना समोर आली आहे. अवघा बारावी पास असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने आपण ‘आयएस’ (IAS) अधिकारी झाल्याचा बनाव रचून संपूर्ण सोसायटीला अक्षरशः वेठीस धरल्याचे उघडकीस आले आहे. म्हाडाच्या लॉटरीतून सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या तोतया अधिकाऱ्याने सोसायटीच्या ३५ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले असून, बाणेर पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा: Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

कसा रचला बनाव?

हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या तोतया ‘आयएएस’ अधिकाऱ्याचे नाव आहे. हितेश हा त्याच्या कुटुंबीयांसह बाणेरमधील इन्क्लुझिव्ह को-ऑपरेटिव्ह सोसायटीत वास्तव्यास आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत त्याने हा संपूर्ण कट रचला. त्याने सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपली ‘आयएस’ अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची खोटी माहिती पसरवली होती. त्याच्या या खोट्या रुबाबावर विश्वास ठेवून सोसायटीच्या समितीने त्याची थेट सोसायटीच्या चेअरमनपदी निवड केली.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीची दादर रेल्वे स्थानकावरून सुरक्षित सुटका; सोशल मीडियामुळे छत्तीसगडवरून आली अन्…

३५ लाखांचा अपहार उघड

चेअरमनपदाचा गैरवापर करत हितेशने सोसायटीतील रिकाम्या सदनिका लॉटरी पद्धतीने मिळवून देतो, असे सांगत लोकांकडून आणि सोसायटीच्या खात्यात १९ लाख रुपये जमा करून घेतले. एवढेच नव्हे, तर सोसायटीच्या ३७ लाखांच्या मुदत ठेवीवर (FD) परस्पर १० लाख रुपयांचे कर्ज काढून मोठा आर्थिक घोटाळा केला. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर सोसायटीचे खजिनादार दत्तराय नागरगोजे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाणेरमधील फसवणुकीच्या प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१) असे आरोपीचे नाव असून, तो अवघा बारावी पास असूनही स्वतःला आयएस अधिकारी म्हणून मिरवत होता.

  • Que: आरोपीने नागरिकांची कशी फसवणूक केली?

    Ans: त्याने स्वतःची बनावट आयएस अधिकारी म्हणून ओळख निर्माण करून सोसायटीचा चेअरमन पद मिळवले. त्यानंतर म्हाडाच्या लॉटरीतून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळले आणि सोसायटीच्या एफडीवर परस्पर कर्ज काढून ३५ लाखांचा अपहार केला.

  • Que: याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: सोसायटीच्या खजिनदाराच्या फिर्यादीवरून बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तोतया अधिकारी हितेश कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Pune baner fake ias officer arrested fraud mhada lottery scam sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Fake Degree
  • Fake Police
  • Fraud Case
  • IAS Officer
  • Latest pune news update
  • scam

संबंधित बातम्या

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!
1

Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
2

दुबईतून भारतात ऑनलाइन फसवणुकीचा मोठा कट; 10 ते 12 हजार सिमकार्ड पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई
3

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!
4

Group Attack: तरुणावर लोखंडी फायटर अन् दगडांनी टोळीचा जीवघेणा हल्ला; संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.