Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Real Estate News : सोन्याचं ऑफिस की हिऱ्याचं? पुण्यात महिन्याला ८.५ कोटी रुपये भाडं देणारा ‘हा’ व्यवहार चर्चेत

शहरातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात विक्रमी भाडेकरारांची मालिका सुरू आहे. सध्या खराडी परिसरातील एका व्यवहाराने मोठी खळबळ उडाली आहे. या व्यवहाराची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 12:30 AM
kharadi office lease deal

kharadi office lease deal

Follow Us
Follow Us:
  • महिन्याला 8.5 कोटी भाडे
  • पुण्यातील सर्वात महागडी डील
  • 10 लाख स्क्वेअर फूटसाठी हजार कोटींचा करार
Pune Commercial Real Estate : पुणे : शहरातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात विक्रमी भाडेकरारांची मालिका सुरूच असून, आता खराडी परिसरातील एका व्यवहाराने जागतिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. बीपी बिझनेस सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खराडी मायक्रो-मार्केटमधील गेरा कॉमरझोन आर टू येथे तब्बल 10.40 लाख चौरस फूट कार्यालयीन जागा 10 वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे.

हे देखील वाचा : पुण्यात मोठी खळबळ! कोट्यावधींच्या १५ जमिनी थेट सरकारजमा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

व्यवहाराची किंमत ऐकूण चक्रावाल

या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 1,258 कोटी रुपये असून, प्रति चौरस फूट 82 रुपये दराने कंपनीला दरमहा सुमारे 8.53 कोटी रुपये भाडे मोजावे लागणार आहे. 7 एप्रिल 2025 पासून हा करार लागू झाला असून, कंपनीने 51.20 कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत.

करारानुसार ही रक्कम दरवर्षी 4.5 टक्क्यांनी वाढणार आहे. सहा पोडियम स्तर आणि 12 मजल्यांचा समावेश असलेली ही जागा अत्यंत प्रशस्त असून, मोठ्या प्रमाणावर कार्यालयीन विस्तारासाठी उपयुक्त आहे. पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC), आयटी व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून वाढती मागणी लक्षात घेता खराडी परिसर प्रमुख ऑफिस कॉरिडॉर म्हणून उदयास आला आहे.

इतर मोठे व्यवहार

याच पार्श्वभूमीवर इतरही मोठे व्यवहार झाले आहेत. वी वर्कने वाकडमधील फिनिक्स मिलेनियम टॉवर-3 मध्ये सुमारे 2 लाख चौरस फूट जागा 161 कोटी रुपयांहून अधिक किमतीत भाड्याने घेतली आहे. तसेच वेल्सपुन इंटरप्राईजेस लिमिटेड ने हिंजवडीतील रेडियस आयटी पार्कमध्ये 4.5 लाख चौरस फूट जागा 82 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेवर घेतली आहे.

ग्लोबल सर्विस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड ने 1.93 लाख चौरस फूट जागा 10 वर्षांसाठी घेतली असून, मासिक भाडे 1.42 कोटी रुपये आहे. तर BMW ने ईएसआर पुणे इंडस्ट्रियल पार्कमध्ये लॉजिस्टिक्ससाठी अतिरिक्त जागा भाड्याने घेतली आहे. एकूणच, पुण्यातील व्यावसायिक कार्यालयीन जागांची मागणी झपाट्याने वाढत असून, शहर देशातील महत्त्वाच्या कॉर्पोरेट हबपैकी एक म्हणून अधिक बळकट होत आहे.

कोट्यावधींच्या १५ जमिनी थेट सरकारजमा

खराडीतील या प्रकरणाची चौकशी सुरु असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. प्रशासनाने कब्जेहक्काने तसेच भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींचा अटींनुसार वापर न केल्यामुळे १५ जमिनी जप्त केल्या आहेत.

हे देखील वाचा : Digitization of Documents : १५० वर्षांचा इतिहास आता एका क्लिकवर! राज्यातील ३० कोटी जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन सुरू

Web Title: Pune costliest office deal kharadi 1258 crore 8 5 crore rent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.