Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

५ लाखांच्या खंडणीसाठी झालेल्या कथित कटाचा तपास पुढे सरकताच या प्रकरणाचे धागेदोरे आणखी खोलवर जात असल्याचे समोर आले आहे. १७ जणांचा सहभाग, हल्ल्यासाठी ८ दुचाकींचा वापर आणि हॉटेलमधील कथित गुप्त बैठक...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 09:47 AM
चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

Follow Us
Follow Us:
  • दिव्याच्या कोठडीत २ ऑक्टोबरपर्यंत वाढ
  • १७ जणांचा सहभाग; ८ दुचाकींचा वापर
  • हॉटेल सीसीटीव्हीत खंडणीची बैठक कैद
 

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्यावरील जीवघेणा हल्ला आणि पाच लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा असलेल्या ‘बिग बॉस’फेम दिव्या सुनील शिंदे हिच्या पोलीस कोठडीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी २ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यात आतापर्यंत तब्बल १७ जणांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. डॉ. गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी आठ दुचाकींचा वापर करण्यात आल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे.

हेही वाचा: कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…

चौकशी टाळण्यासाठी आरडाओरड केल्याचा पोलिसांचा दावा

पोलीस चौकशीदरम्यान दिव्या शिंदे माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. चौकशी टाळण्यासाठी ती विचित्र अंगविक्षेप करते, मोठ्याने आरडाओरड करते तसेच आपल्याला ‘अँग्झायटी अटॅक’ येत असल्याचे सांगते, असा पोलिसांचा आरोप आहे. या माध्यमातून ती तपासातील महत्त्वाची माहिती लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात नमूद केले.

हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा

तपास पथकाने पुणे कॅम्प परिसरातील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये मुख्य आरोपी अप्पा ढमढेरे, डॉ. गायकवाड आणि त्यांचा मुलगा यांच्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीबाबत बैठक झाल्याचे दिसत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात अप्पा ढमढेरे, निखिल शिंदे, निखिलची होणारी पत्नी, कोंढवा येथील ताहीर यांच्यासह अन्य १३ अज्ञात व्यक्तींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

हत्यारांसह मोबाईल जप्त करणे बाकी

सरकारी वकील ॲड. आम्रपाली कस्तुरे यांनी न्यायालयात पोलिसांची बाजू मांडताना, हल्ल्यासाठी वापरलेले लोखंडी हत्यार, लाकडी दांडके, आरोपींच्या स्वाक्षऱ्यांचे नमुने तसेच हल्ल्याचे चित्रीकरण करणारा मुख्य मोबाईल फोन अद्याप जप्त करणे बाकी असल्याचे सांगितले. या संपूर्ण कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी दिव्या शिंदेची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. मूळ तक्रारदारांच्या बाजूने ॲड. शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले.

Web Title: Pune dr vidyadhar gaikwad attack extortion divya shinde police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Bigg Boss
  • Maharashtra. Pune
  • pune crime case
  • pune crime news

संबंधित बातम्या

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…
1

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण
2

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती
3

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
4

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.