पुण्यातील बाबा भिडे पूल राहणार बंद (प्रातिनिधिक फोटो- istockphoto)
पुणे: पुणेकर नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. बाबा भिडे पूल पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पावसाळ्यात हा सुप्रसिद्ध असलेला बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पुण्यात पाणी भरले असे म्हटले जाते. दरम्यान आता पुढील दीड महिना बंद राहणार आहे. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात.
पुण्यातील बाबा भिडे पूल वाहूतकीसाठी दीड महीने बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनशेजारी पादचारी मार्गाचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ तसेच या उपनगरातून हजारांच्या संख्येने वाहने ये-जा करत असतात.
दरम्यान बाबा भिडे पूल बंद झाल्याने पुणे पोलिसांना नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची सोय करावी लागणार आहे. पुणे मेट्रोच्या पादचारी मार्गाचे काम सुरू असल्याने भिडे पूल बंद राहणार आहे. पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्याय मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पुणेकरांची मोठी गैरसोय होणार आहे.
बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग आहे. असंख्य पुणेकर वाहतुकीसाठी नदीपात्रातील मार्गाचा वापर करतात. मात्र आता हा पूल बंद झाल्याने वाहतूक कोणत्या मार्गे वळवली जाते हे पहावे लागणार आहे.
पुणे मेट्रोचे विस्तारीकरण होणार
मेट्राेच्या हडपसर ते लाेणीकंद आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मार्गांच्याविस्तारीकरणाच्या आराखड्यास महापािलकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि महामेट्राे यांनी पुणे महापालिका क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतुक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पुणे शहराचा भविष्यात हाेणारा विस्तार आणि विकास लक्षात घेऊन मेट्राे मार्गांचा अधिक विस्तार करण्याची गरज या अहवालात व्यक्त केली आहे.
तसेच पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण ( पुम्टा )च्या बैठकीत हडपसर ते लाेणी काळभाेर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मेट्राे मार्गिंकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालास महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे.
स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे. हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.