Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात मोठी खळबळ! कोट्यावधींच्या १५ जमिनी थेट सरकारजमा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Pune land Dispute : पुणे जिल्ह्या प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कब्जेहक्काने तसेच भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींचा अटींनुसार वापर न केल्यामुळे कोट्यावधींच्या जमिनी जप्त करण्यात आल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 04:42 PM
Pune Land Seizure

Pune Land Seizure

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात मोठी खळबळ
  • कोट्यावधींच्या १५ जमिनी थेट सरकारजमा
  • जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Pune Land Government Takeover : पुणे/आकाश ढुमेपाटील : जिल्ह्यात कब्जेहक्काने तसेच भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींचा अटींनुसार वापर न केल्यामुळे कठोर पावले उचलण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील १५ जमिनी जप्त करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने केली आहे. या जमिनी पुन्हा शासनाच्या ताब्यात जमा करण्यात येणार आहेत. याशिवाय ६ प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले असून उर्वरित प्रकरणांवर पुढील महिनाभरात निर्णय अपेक्षित आहे.

हे देखील वाचा : Digitization of Documents : १५० वर्षांचा इतिहास आता एका क्लिकवर! राज्यातील ३० कोटी जुन्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन सुरू

३६० प्रकरणांची चौकशी सुरु

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शर्तभंग झालेल्या जमिनींची सखोल तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात देवस्थान, वतन, आदिवासी तसेच शासनाने भाडेतत्त्वावर किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींच्या वापरात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली आहे. अशा सुमारे ३६० प्रकरणांची नोंद झाली आहे.

या जमिनी वर्ग-१ आणि वर्ग-२ अशा प्रकारांत विभागल्या जातात. वर्ग-२ मध्ये देवस्थान, पुनर्वसन, प्रकल्पग्रस्त, आदिवासी तसेच भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. या जमिनींची विक्री, खरेदी किंवा वापरात बदल करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. परवानगी न घेता व्यवहार केल्यास तो शर्तभंग मानला जाऊन जमीन शासनाकडे जप्त केली जाऊ शकते.

गैरव्यवहाराची कारणे

तपासणीत अनेक ठिकाणी मूळ उद्देशापेक्षा वेगळ्या कारणांसाठी जमिनींचा वापर केल्याचे आढळले आहे. रहिवासी जमिनींचा व्यावसायिक वापर, परस्पर भाड्याने देणे, सभासदांमध्ये बदल करणे तसेच मुदतीत जमीन वापरात न आणणे ही शर्तभंगाची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.

मुंढवा येथील बोटॅनिकल गार्डन, बोपोडी येथील कृषी विभागाची जागा आणि ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनींच्या गैरव्यवहारानंतर प्रशासन सतर्क झाले.

महसूल विभागाने केलेल्या तपासणीत ही प्रकरणे उघडकीस आली असून पुढील कारवाई सुरू आहे. तहसीलदार (महसूल शाखा) उमाकांत कडनोर यांनी सांगितले की, उर्वरित प्रकरणांमध्ये पंचनामे, चौकशी अहवाल आणि कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

हे देखील वाचा : संतापजनक! ४ वर्षांच्या निरागस कळीला नराधमाने खुडले; समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत?

Web Title: Pune land seizure 15 properties crore value district collector action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.