Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PUNE NEWS : भाजपाला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 27, 2025 | 09:45 PM
PUNE NEWS: A major blow to the BJP! Senior leader Dhanraj Aswani joins the Nationalist Congress Party.

PUNE NEWS: A major blow to the BJP! Senior leader Dhanraj Aswani joins the Nationalist Congress Party.

Follow Us
Close
Follow Us:

Dhanraj Aswani resigns from the BJP : पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आसवानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी उपस्थित होते.

हेही वाचा : गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कुऱ्हाड चालणार! BCCI कडून ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव निश्चित?

धनराज आसवानी हे भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी सविता धनराज आसवानी या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर ३००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने वॉर्ड क्रमांक १९ मधून निवडून आल्या होत्या. २०१७ मध्ये धनराज आसवानी यांनी याच वॉर्ड मधून भाजपा च्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. दिवंगत आमदार तथा भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या बरोबर धनराज आसवानी यांनी भाजपा शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती. सिंधी समाज आणि प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांबरोबर त्यांचा चांगला संपर्क आहे.

२००५ – ०६ या काळात सेवा विकास बँकेचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्या काळात त्यांनी या बँकेचे ‘एनपीए’ चे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणले होते. धनराज आसवानी हे सध्या पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. धनराज आसवानी यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत पिंपरी मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयाचे नूतनीकरण, साधू वासवानी उद्यानाचे नूतनीकरण, जयहिंद हायस्कूलचे नूतनीकरण आणि मिलिंद नगर स्मशान भूमीचे नूतनीकरण केले आहे.

हेही वाचा : U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी

तसेच पूर्ण पिंपरी कॅम्प मधून हाय टेन्शन वायर काढून भूमिगत केबल टाकली, प्रभागात असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह व आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पवना नदीच्या झुलेलाल घाटावर गणपती विसर्जन कुंड उभारणे, घाटावर डबर टाकून नूतनीकरण केले. कोविड काळात नदीलगत असणाऱ्या संजय गांधी नगर, मिलिंद नगर, रिव्हर रोड परिसरातील नागरिकांना ब्लॅंकेट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना दिलासा दिला आहे. धनराज आसवानी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.

Web Title: Pune news senior bjp leader dhanraj aswani joins nationalist congress party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • Local Election
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन; ‘या’ भागात अस्वस्थता उफाळली
1

भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन; ‘या’ भागात अस्वस्थता उफाळली

पिंपरी- चिंचवडमध्येही राजकीय भूकंप; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
2

पिंपरी- चिंचवडमध्येही राजकीय भूकंप; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.