गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Gautam Gambhir’s future as head coach is in jeopardy : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला संपटून मार खावा लागला आणि भारताने मालिका ०-२ अशी गमावली. त्यानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापनावर टीका झाली होती. त्यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आपल्या खिशात टाकली. तथापि, आफ्रिकन संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर, गौतम गंभीरच्या रेड-बॉल प्रशिक्षकपदाच्या पदाबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. आता, एका अहवालामध्ये एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका अधिकाऱ्याने व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधण्यात आला असून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हेही वाचा : Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर
भारताच्या पांढऱ्या चेंडूच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीरचा रेकॉर्ड प्रभावी राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एसीसी ट्रॉफी देखील जिंकली आहे. तथापि, कसोटीतील त्यांचा रेकॉर्ड मात्र निराशाजनक राहिला आहे. मागील महिन्यात घरच्या मैदानावर झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला दक्षिण आफ्रिकेने चांगलेच लोळवले. त्यानंतर क्रिकेट बोर्डातील एका प्रभावशाली खेळाडूने पुन्हा एकदा अनौपचारिकरित्या व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधून त्याला रेड-बॉल संघाचे प्रशिक्षकपदी येण्याची इच्छा आहे का याबाबत जाणून घेतले.
तथापि, या महान फलंदा व्ही व्ही लक्ष्मणकडून बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे “क्रिकेट प्रमुख” म्हणून राहिल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे. गौतम गंभीरचा बीसीसीआयसोबतचा करार २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अखेरीपर्यंत असणार आहे. पाच आठवड्यांनी सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकातील भारताच्या कामगिरीच्या आधारे यावर पुनर्विचार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या वर्तुळात, २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील बाकी असणाऱ्या नऊ कसोटी सामन्यांसाठी रेड-बॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून गंभीर योग्य व्यक्ती आहे का याबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर, भारताचे काही परदेश दौरे देखील असणार आहेत, ज्यामध्ये ऑगस्ट २०२६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी आणि ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका यांचा समावेश आहे. त्यानंतर भारत २०२७ मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषावणार आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राकडून नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगण्यात आले आहे की, “गंभीरला भारतीय क्रिकेटच्या शक्तीशाली वर्तुळामध्ये जोरदार पाठिंबा असून जर भारताने टी-२० विश्वचषक कायम ठेवला किंवा किमान अंतिम फेरी गाठली तर तो अखंडपणे त्याची भूमिका बजावत राहणार आहे. तथापि, गंभीर कसोटी क्रिकेटमध्येही कायम राहिला तर ते मनोरंजक ठरणार आहे.” सूत्राने पुढे असे देखील म्हटले आहे की, “त्याचा फायदा असा आहे की रेड-बॉल फॉरमॅटमध्ये फारसे पर्याय उपलब्ध नाहीत, कारण व्हीव्हीएस लक्ष्मणला वरिष्ठ कसोटी संघाचे प्रशिक्षकपद देण्यात रस नाही.”
हेही वाचा : ‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC रँकिंगमध्ये साधली हॅटट्रिक






