शेतकऱ्यांनो सावध व्हा! रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल मोठी किंमत
केरळनंतर आता ‘या’ राज्याचे बदलणार नाव? भाजप खासदाराने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिले पत्र
दौंड पंचायत समिती कृषी विभाग आणि रोटरी क्लब ऑफ यांच्या संयुक्त विद्यमाने यवत येथे ‘सेंद्रिय शेती कार्यशाळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य मार्गदर्शक कृषी तज्ज्ञ डॉ विनोद पाटील बोलत होते. याप्रसंगी दौंडचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, रोटरीचे एन्व्हायर्नमेंट डायरेक्टर राजेंद्रकुमार सराफ, रोटरीचे अध्यक्ष दीपक शासम तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ पाटील यांनी शेतकरी जे विविध शेतपिके आणि फळे घेतात यावर प्रकाश टाकला. आरोग्यावर घाला, अन्नातून शरीरात जाणाऱ्या रासायनिक अंशामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत आहे. (Farmers News)
अधिक उत्पादनाच्या मोहापायी रासायनिक खतांचा वापर वाढला. ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडला. खराब जमिनीत पीक घेण्यासाठी पुन्हा रसायनांचा वापर करावा लागत असल्याने हे घातक चक्र सुरूच आहे. मात्र, भविष्यात संभाव्य धोके ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. आपल्या पूर्वजांची पारंपरिक शेती पद्धत आज विस्मृतीत जात आहे. आज त्याच पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले
डॉ. पाटील यांनी यावेळी स्वतः विकसित केलेल्या ‘एस. व्ही. गोल्ड’ या जैविक जिवाणूंची माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे केळी, पेरू, ऊस, डाळिंब आणि भाजीपाला पिकांमध्ये लक्षणीय उत्पादनवाढ झाल्याचे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. शेतकरी समाधान शिंदे, दत्तात्रेय दोरगे आणि सुनील राऊत या शेतकऱ्यांनी जैविक शेतीचे आपले सकारात्मक अनुभव यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगत सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक शेती हाच भविष्यातील शाश्वत पर्याय असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, या कार्यशाळेत दौंड तालुक्यातून आलेल्या अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बाबत विविध बाबी आणि महत्त्वाच्या माहिती प्रत्यक्षात पाहायला मिळाली.






