Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Railway News : पुणे रेल्वेच्या केटरिंग सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद; महसूलात २६ टक्क्यांनी वाढ

Pune Railway News : पुणे रेल्वे विभागाच्या केटरिंग सेवांच्या उत्पन्नात २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये उत्पन्न ३ कोटी ९५ लाख ९९ हजार ३०८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 12:30 AM
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सज्ज; असुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी 24 तास स्थिर सुरक्षारक्षक

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सज्ज; असुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी 24 तास स्थिर सुरक्षारक्षक

Follow Us
Follow Us:
  • पुणे रेल्वेच्या केटरिंग सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद
  • महसूलात २६ टक्क्यांनी वाढ
  • उद्दिष्टा पेक्षा अधिक उत्पन्न
Pune Railway News in Marathi : चंद्रकांत कांबळे : पुणे रेल्वे विभागाच्या केटरिंग सेवांच्या उत्पन्नात २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २६.१८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात विभागाला केटरिंग सेवांमधून ३ कोटी १३ लाख ८२ हजार ११४ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये वाढ होऊन २०२५-२६ मध्ये उत्पन्न ३ कोटी ९५ लाख ९९ हजार ३०८ रुपयांवर पोहोचले आहे. रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची वाढती संख्या, खाद्यपदार्थांच्या विक्रीत झालेली वाढ आणि केटरिंग सेवांमधील सुधारणा यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

हे देखील वाचा : Pune News : पुणेकरांची परदेशवारी सुसाट; मागील पाच वर्षांत पासपोर्ट अर्ज दुप्पट

विभागाच्या मासिक आकडेवारीनुसार काही महिन्यांत विक्रमी वाढ दिसून आली आहे. विशेषतः जुलै महिन्यात सर्वाधिक २०५.०९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. २०२४-२५ मध्ये जुलै महिन्याचे उत्पन्न १२ लाख ४३ हजार ३२ रुपये होते, तर २०२५-२६ मध्ये ते वाढून ३७ लाख ९२ हजार ३३८ रुपयांपर्यंत पोहोचले. सप्टेंबर महिन्यातही १८२.६२ टक्क्यांची वाढ झाली असून उत्पन्न १७ लाख २४ हजार २७६ रुपयांवरून ४८ लाख ७३ हजार १८३ रुपयांपर्यंत गेले.

डिसेंबर महिन्यात १६७.२१ टक्के वाढ झाली असून उत्पन्न १२ लाख ८३ हजार ४५३ रुपयांवरून ३४ लाख २९ हजार ५०४ रुपयांवर पोहोचले. जानेवारी महिन्यात ११५.२२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली, तर मार्च महिन्यात ७०.३१ टक्के वाढ झाली. जून महिन्यातही ४६.२७ टक्क्यांची वाढ झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

मात्र काही महिन्यांत उत्पन्नात घटही झाली आहे. मे महिन्यात सर्वाधिक ६८.७५ टक्क्यांची घट नोंदवली गेली. ऑगस्ट महिन्यात ६०.०८ टक्के, नोव्हेंबरमध्ये ४४.३० टक्के आणि फेब्रुवारीमध्ये ४५.८९ टक्क्यांची घट झाली. एप्रिल महिन्यातही किरकोळ ०.७९ टक्क्यांची घट दिसून आली.

उद्दिष्टा पेक्षा अधिक उत्पन्न

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला रेल्वे प्रशासनाकडून केटरिंग सेवेतून ३ कोटी ८० लाखांचे वार्षिक उद्दिष्टे देण्यात आले होते. दिलेल्या उद्दिष्टा पेक्षा १६ लाखांचे अधिकचे उत्पन्न पुणे विभागाने मिळवले.

मध्य रेल्वे पुणेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार म्हटले की,  पुणे विभागातील विविध स्थानकांवर खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची वाढ, प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि प्रवासी संख्येत झालेली वाढ यामुळे केटरिंग व्यवसायाला चालना मिळाली आहे. आगामी काळात प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि स्वच्छ सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे.

हे देखील वाचा : MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज

Web Title: Pune railway news catering revenue rises 26 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • Railway News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
4

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.