Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक कोंडीतून होणार सुटका? पुणे शहराबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारकडून शुक्रवारी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 03:42 PM
वाहतूक कोंडीतून होणार सुटका? पुणे शहराबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे

वाहतूक कोंडीतून होणार सुटका? पुणे शहराबाहेरही विस्तारणार मेट्रोचे जाळे

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे मेट्रो टप्पा-२ खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारकडून शुक्रवारी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील मेट्रोमार्गांबरोबर आता शहराबाहेरही मेट्रोचे जाळे विस्तारणार असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांना मेट्रोच्या विस्तारामुळे दिलासा मिळणार आहे.

 

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून, त्यामध्ये एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही उपमार्गिका पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे आणखी विस्तारित होणार असून, शहराच्या पूर्व परिसरासह ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे.

तसेच हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे मल्टिलेव्हल इंटेग्रेशन करून पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे. आता हडपसर बस डेपो ते सासवड रोडपर्यंत राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याने मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

रामवाडी ते वाघोली ११ किमी लांबीच्या नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये रामवाडी ते वाघोली असा ११ किमी लांबीच्या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे अहिल्यानगर मार्गावरील रामवाडीपासून आता ही मेट्रो वाघोलीपर्यंत जाणार आहे. या नव्या मार्गामुळे नगर रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीतून वाट काढत शहराच्या मध्यभागांत कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

कामगार, विद्यार्थी, आयटी कर्मचारी आणि महिलांसाठी मेट्रो अंत्यत उपयोगी

मेट्रो सेवा ही पर्यावरणपूरक वाहतुकीचा उत्तम पर्याय आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करून, कार्बन उत्सर्जन घटविण्यात मेट्रोची मोठी भूमिका राहणार आहे. याचा थेट फायदा पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेला होणार असून, आरोग्याच्या दृष्टीनेही हा बदल महत्त्वाचा ठरेल. कामगार, विद्यार्थी, आयटी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मेट्रो हा अत्यंत सोयीचा प्रवासाचा पर्याय ठरत आहे. पार्किंगची चिंता, इंधनाचा खर्च, वाहतूक पोलिसांच्या अडचणी यांपासून मुक्तता मिळत आहे. ‘पहिल्या व शेवटच्या मैलाची’ (लास्ट माइल कनेक्टिव्हिटी) व्यवस्था बस, ई-रिक्षा आणि सायकल सुविधांमुळे अधिक सुलभ होत आहे.

Web Title: Pune residents will get a big relief as the metro will be expanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune metro news
  • pune news

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.