Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-चलन प्रलंबित असल्याचा मेसेज आलाय? RTO ने दिला नागरिकांना ‘हा’ इशारा

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या नावाने वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे एसएमएस तसेच व्हॉटसअॅप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 29, 2025 | 03:48 PM
ई-चलन प्रलंबित असल्याचा मेसेज आलाय? RTO ने दिला नागरिकांना 'हा' इशारा

ई-चलन प्रलंबित असल्याचा मेसेज आलाय? RTO ने दिला नागरिकांना 'हा' इशारा

Follow Us
Close
Follow Us:

फसवे ई-चलन मेसेजपासून सावधान 
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचा नागरिकांना इशारा
मेसेज बनावट असल्याचे आले समोर

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (Pune RTO) यांच्या नावाने वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे एसएमएस तसेच व्हॉटसअॅप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संदेशांमध्ये नागरिकांकडून ओळख तपासण्याच्या नावाखाली (Pune) वाहन परिवहन किंवा इतर अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले जात असून, हे संदेश पूर्णतः बनावट (Crime) असल्याचे वाहनधारकांच्या तक्रारीतून समोर आले आहे.

अशा फसवणुकीच्या हेतूने पाठविण्यात आलेल्या मेसेजचा नमुना पुढीलप्रमाणे आहे.प्रिय वाहन मालक/चालक, आपणास वाहतूक चलन (ई-चलान) जारी करण्यात आले आहे. चलन क्रमांक (चलान क्रमांक): LA21071734311687, आपली ओळख निश्चित करण्यासाठी आणि पुरावा पाहण्यासाठी, कृपया वहन परिवहन ॲप स्थापित इंस्टॉल करा.

Navale Bridge Accident: वाहनांच्या तपासणीकडे आरटीओकडून दुर्लक्ष; बेशिस्त ५८ हजार वाहनधारकांवर कारवाई

हे ॲप आपल्याला आवश्यक माहिती प्रदान करेल. धन्यवाद, आरटीओ कार्यालय असे येत आहे.आरटीओ पुणे कडून मूळ संदेशाचे स्वरूप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ पुणे) ई-चलान संदर्भातील संदेश हे वरील नमुन्यापेक्षा पूर्णतः भिन्न असतात. MH12XXXXXX हे वाहन मोटर वाहन अधिनियम, १९८८ (MV Act, 1988) चे उल्लंघन करताना सार्वजनिक ठिकाणी आढळले आहे. कृपया https://rtomh.in/print?id=Gka5JFm या नोटीसमध्ये (नोटीस) माहिती पहा आणि दंडाची रक्कम भरा.आरटीओ पुणे असे आहे.

अनोळखी ॲप्स कधीही डाउनलोड करू नका.तरी नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या कोणत्याही संदेशातील लिंक उघडू नये अथवा त्यावर क्लिक करू नये. अशा बनावट मेसेजकडे तात्काळ दुर्लक्ष करावे आणि सायबर गैरप्रकाराच्या स्वरूपात तक्रार सायबर पोलीस विभागाकडे नोंदवावी.नागरिकांनी सत्यता तपासून, अधिकृत संकेतस्थळावरील तपशीलच ग्राह्य धरावेत असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी केले आहे.

Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी

अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये

नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुणे–सातारा महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ दोन भरारी पथके तैनात केली आहेत. शनिवारपासून (ता. २२) जडवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची २४ तास शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये डोळ्यांची तपासणी, मद्यप्राशन तपासणी तसेच वाहनांची तांत्रिक तपासणी समाविष्ट आहे. नुकतीच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नवले पूल परिसराची पाहणी करून तपासणीसाठी ठेवलेल्या जागेचा आढावा घेतला. खेड शिवापूर टोलनाक्यावरील ‘वे ब्रिज’जवळ वाहनांना थांबवून तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Pune rto department alert to people fake e challans messages crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune RTO

संबंधित बातम्या

PUNE NEWS : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भाजप–शिवसेना एकत्र?
1

PUNE NEWS : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान देण्यासाठी भाजप–शिवसेना एकत्र?

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक
2

Nalasopara Crime: करोडपती होण्याचे स्वप्न भंगले! व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली
3

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

PUNE NEWS: ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका! तपासणीत1877 ऑटोरिक्षा दोषी; 105 परवाने निलंबिल
4

PUNE NEWS: ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका! तपासणीत1877 ऑटोरिक्षा दोषी; 105 परवाने निलंबिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.