Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: बाल लसीकरणात पुणे आघाडीवर; आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी

बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर विशेष लसीकरण कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 21, 2026 | 02:35 AM
Pune News: बाल लसीकरणात पुणे आघाडीवर; आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी
Follow Us
Follow Us:

आरोग्य विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेला यश
बाल लसीकरण प्रकारांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक कामगिरी
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ६३ हजार ५६५ बालकांच्या जन्माची नोंद

सुनयना सोनवणे /पुणे:  बालमृत्यू रोखणे, संसर्गजन्य आजारांवर (Health) नियंत्रण मिळवणे आणि एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेला पुणे शहरात मोठे यश मिळाले आहे. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अंतिम अहवालानुसार एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत शहरातील बहुतांश बाल लसीकरण प्रकारांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक कामगिरी नोंदविण्यात आली आहे.

अहवालानुसार या कालावधीत शहरात एकूण ६३ हजार ५६५ बालकांच्या जन्मांची नोंद झाली असून, हे प्रमाण वार्षिक उद्दिष्टाच्या १०२ टक्के आहे. जन्मानंतर बालकांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी, व्हिटॅमिन-के, हेपेटायटिस-बी आणि ओपीव्ही लसीकरणात १०१ ते १०७ टक्क्यांपर्यंत उद्दिष्टपूर्ती झाली आहे. तसेच पेंटाव्हॅलेंट, ओपीव्ही, आयपीव्ही आणि रोटाव्हायरस लसीकरणात १०६ टक्के कामगिरी नोंदविण्यात आली आहे.

शहरातील ९ ते ११ महिन्यांच्या बालकांसाठी राबविण्यात आलेल्या गोवर-रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेत १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, पीसीव्ही बूस्टरमध्येही १०७ टक्के कामगिरी नोंदवली गेली आहे. तसेच १६ ते २४ महिन्यांतील बालकांसाठीच्या गोवर-रुबेलाची दुसरी मात्रा, डीपीटी बूस्टर आणि ओपीव्ही बूस्टरमध्ये १०८ टक्के कामगिरी झाली आहे.

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

आरोग्य विभागाने घरभेटी, स्थलांतरित व झोपडपट्टी भागातील बालकांचा शोध, तसेच जनजागृती मोहिमांवर विशेष भर दिल्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचाही मोठा वाटा राहिला.

दरम्यान, बालकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर विशेष लसीकरण कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कृती दल लसीकरण मोहिमांचा नियमित आढावा घेणार असून, त्रुटी दूर करणे, निधी वापरावर लक्ष ठेवणे आणि वंचित बालकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यावर भर देणार आहे.

Secondary Infertility : एका मुलांनंतर दुसऱ्या गर्भधारणेत अडचण? ‘दुय्यम वंध्यत्व’ म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

एकूण जन्म नोंद : ६३,५६५
उद्दिष्टपूर्ती : १०२ टक्के
बीसीजी ते ओपीव्ही : १०१-१०७%
पेंटाव्हॅलेंट व रोटाव्हायरस : १०६%
एमआर लसीकरण : १०७%
पीसीव्ही बूस्टर : १०७%
डीपीटी/ओपीव्ही बूस्टर : १०८%
पूर्ण लसीकरण झालेले मुलगे : ३४,६५८
पूर्ण लसीकरण झालेल्या मुली : ३२,५०१

Web Title: Pune takes lead in child immunization health department achieves remarkable performance health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Health News
  • Maharashtra Health Department
  • pune news
  • Vaccination For children

संबंधित बातम्या

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
1

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप

पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देण्याचा दावा
2

पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देण्याचा दावा

भाजप- राष्ट्रवादीतील वाद पेटला; नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याच्या विरोधात आंदोलन
3

भाजप- राष्ट्रवादीतील वाद पेटला; नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याच्या विरोधात आंदोलन

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
4

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.