महापालिका निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना धक्का (फोटो- सोशल मिडिया )
पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महायुतीने राज्यात मोठे यश प्राप्त केले आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. शिवसेना पक्षाने मोठे यश मिळवले. मात्र विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर देखील उद्धव ठाकरेंना धक्के बसणे काही थांबत नाहीये. एका मागोमग ठाकरेंच्या पक्षातील अनेक मोठे नेते आणि नगरसेवक, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. पुण्यातील एका नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. नुकतेच माजी आमदार राजन साळवी देखील शिवसेनेत गेले आहेत. महापालिका निवडणुका होण्याआधी ठाकरे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील एका नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख राजेश पळसकर यांनी उद्धव ठाकरेना राम राम केला आहे.
राजेश पळसकर हे पुण्याचे ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख होते. त्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते आणि त्यांचे 50 ते 60 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 22 वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्यानंतर राजेश पळसकर यांनी साथ सोडली आहे. पक्षाला रामराम करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिले आहे.
‘गेली 22 वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे काम करत राहिलो. साम, दाम, दंड, भेद नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो. माझ्या मागून आलेले अनेक जण पक्षाच्या विविध संविधानिक पदावर पोहोचले. कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत होतो. अनेकदा तुरुंगात गेलो. मात्र सध्या पक्षाशी निष्ठा नसलेल्या लोकांना मोठ्या पदावर घेण्याचा पायंडा काही नेते पक्षात पाडत आहेत. सध्या संघटनेत नव्यांना राम राम निष्ठा असणाऱ्याना थांब थांब ही संकल्पना काही नेते अबवत आहेत. हे न पटण्यासारखे आहे. त्यामुळ राजीनामा देत असल्याचे पळसकर यांनी सांगितले.
हेही वाचा: Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का देत आहेत ‘दे धक्का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का देत आहेत ‘दे धक्का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
एकीकडे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असली तरी उद्धव ठाकरेंच्या गटाला गळती लागली आहे. राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. तर भास्कर जाधव हे कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मत मांडताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्यामुळे काँग्रेस सारख्या अविचाराच्या पक्षाशी युती केल्यामुळे हे होत आहे त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून जात आहे, उद्धव ठाकरे यांनी मुळ भुमिकांशी तडजोड करायला नको होती, त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहायला मागत नाहीयेत, अशी भूमिका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.