• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • All Parties Are Preparing Vigorously For The Zilla Parishad Elections In Purandar

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; ‘या’ मुद्द्यांवरच होणार लढत

पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बालेकिल्ले, बंडखोरी आणि स्थानिक मुद्द्यांवरच लढत होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 23, 2026 | 05:39 PM
पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; 'या' मुद्द्यांवरच होणार लढत

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी
  • बालेकिल्ले, बंडखोरी आणि स्थानिक मुद्द्यांवरच लढत
  • सामना लक्षवेधी ठरणार
पुणे : पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय वातावरण तापले आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुरंदरच्या ग्रामीण पट्ट्यात गेल्या काही निवडणुकांपासून सत्ता-समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. विशेषतः विजय शिवतारे २००९ मध्ये आमदार झाल्यापासून हा पट्टा शिवसेनेकडे झुकत गेला. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसने एक जागा जिंकली. त्यावेळी निवडणुकीत राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. ग्रामीण भागातील राष्ट्रवादीविषयीची नाराजी तेव्हाही स्पष्ट होती आणि तीच स्थिती आजही कायम असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संभाजी झेंडे मैदानात उतरले होते. त्यांना सुमारे ४८ हजार मते मिळाली असली, तरी ती ताकद जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक ठरेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पुरंदर तालुक्यात एकूण चार जिल्हा परिषद गट आहेत—दिवे-गराडे, नीरा-कोळविहिरे, बेलसर-माळशिरस आणि वीर-भिवडी. यापैकी दिवे-गराडे गट शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती राजाराम झेंडे यांनी केलेल्या विकासकामांचा ठसा आणि पक्षाची संघटनात्मक ताकद यामुळे शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे बोलले जाते. येथे तिहेरी लढत असली, तरी शिवसेनेकडे माप झुकल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

वीर-भिवडी गटातही चुरस कमालीची आहे. हा गट विजय शिवतारे यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी त्यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ लोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतल्याने लढत रंगतदार बनली आहे. त्यामुळे या गटात शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : तासगाव–कवठेमहांकाळच्या शाश्वत विकासाचा ‘वचननामा’ प्रसिद्ध; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर

सामना लक्षवेधी ठरणार

बेलसर-माळशिरस गटात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष अपेक्षित आहे. तर नीरा-कोळविहिरे गटात पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या कन्या आणि माजी सभापती अतुल मस्के यांच्या पत्नी यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे. या निवडणुकीत केवळ पक्षीय राजकारण नव्हे, तर स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहेत. पाणीटंचाई, प्रस्तावित विमानतळ, दुष्काळी परिस्थिती, गुंजवणी प्रकल्प, मेट्रोचा विस्तार, रस्त्यांची दुरवस्था, विविध पाणी योजना आणि पुरंदर उपसा यांसारख्या प्रश्नांवर मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक ही व्यक्ती, पक्ष आणि विकासाच्या मुद्द्यांवरच लढली जाणार असून, पुरंदरमध्ये कोणाचा बालेकिल्ला अबाधित राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: All parties are preparing vigorously for the zilla parishad elections in purandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Purandar
  • vijay shivtare
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद
1

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक; दुपारी 3.30 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

Mahrashtra Politics: “… शंका बळावत चालली आहे” अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात सपकाळांचे भाष्य
2

Mahrashtra Politics: “… शंका बळावत चालली आहे” अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात सपकाळांचे भाष्य

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
3

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक
4

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

Feb 08, 2026 | 08:00 AM
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.