Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar International Airport साठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Purandar International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या यशस्वी उभारणीचा अनुभव लक्षात घेऊन पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएडीसीला दिले. हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 11:24 AM
पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर विमानतळासाठी 6 हजार कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील
  • कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
  • नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर पुरंदर विमानतळ उभारणार
Purandar International Airport News Marathi: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीतील यशस्वी अनुभवाचा आदर्श समोर ठेवत पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Purandar International Airport) प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ला दिले.

बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या विमानतळ विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आर्थिक गती देण्यासाठी हडको (HUDCO) मार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या कामांना मोठी चालना मिळणार आहे. या बैठकीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्स, कार्गो हाताळणी सुविधा तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा कुंभमेळा-2027 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि मालवाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळ विकास प्रकल्पांमध्ये वेळेचे काटेकोर नियोजन, समन्वय आणि निधीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या. नवी मुंबई विमानतळाप्रमाणेच पुरंदर विमानतळाचाही विकास वेगाने पूर्ण करून पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरंदर विमानतळ सुरू झाल्यानंतर पुणे परिसरातील वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच उद्योग, निर्यात, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळून राज्याच्या पायाभूत विकासात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

या गावांतील जमिनी विमानतळासाठी घेणार

पारगाव, वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी आणि खानवडी. विमानतळासाठी एकूण ३ हजार एकर इतकी जमीन आवश्यक असून त्यापैकी २ हजार ८०० एकर जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची संमती मिळाली आहे, अशी माहिती समोर आली.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…

Web Title: Purandar international airport rs 6000 crore loan approved shirdi cargo project cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Purandar Airport
  • shirdi

संबंधित बातम्या

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा
1

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा

‘जरांगेंच्या भाषेवर मंत्र्यांचा संताप!’; कॅबिनेट बैठकीत फडणवीसांसमोर नाराजी, ‘हिंदू उत्सवातच मुंबईत आंदोलन का?’
2

‘जरांगेंच्या भाषेवर मंत्र्यांचा संताप!’; कॅबिनेट बैठकीत फडणवीसांसमोर नाराजी, ‘हिंदू उत्सवातच मुंबईत आंदोलन का?’

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
3

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
4

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.